जेव्हा करीना कपूर ने विद्या बालन वर सर्वांसमोर केली अशी घाणेरडी कमेंट.. वाचून कोणालाही वाटेल लाज..

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडची गॉसिप गर्ल म्हणून ओळखली जाते. करीना बिनधास्तपणे बॉलिवूडमधील कलाकारांबद्दलचे तिचे मत व्यक्त करते.बऱ्याचवेळा तिने केलेल्या वक्तव्यांमुळे तिला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला आहे.

एकदा तर करीना कपूर एका मुलाखतीत विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला म्हातारी बोलली होती. ही मुलाखत करीनाच्या ‘हिरोइन’ या चित्रपटादरम्यान झाली होती. या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला विचारण्यात आले होते. मात्र, प्रेग्नेंट असल्यामुळे ऐश्वर्याने चित्रपटाची ऑफर नाकारली होती. 

तसेच करीनाने एकदा अभिनेत्री विद्या बालनवर देखील वक्तव्य केलं होतं. विद्याच्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील भूमिकेवर करीनाने तिचे मत व्यक्त केले होते. या चित्रपटासाठी विद्या बालनने वजन वाढवले होते. या चित्रपटाची आणि यात विद्याने साकारलेल्या सिल्क स्मिताच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती.

या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. याच भूमिकेवर करीनाने म्हटले होते की “जाड असल्यावर सुंदर दिसत नाही. जो कोणी असे बोलतो तो वेडा आहे. आकर्षक दिसणे म्हणजे सुंदर आहे, पण जाड नाही. कोणतीही स्त्री जी बोलते की मला बारीक व्हायचे नाही, ती खोटे बोलते. कारण प्रत्येक मुलीचे हे स्वप्न आहे.

करीना इतकेच नाही बोलली तर पुढे म्हणाली की, काही अभिनेत्रींमध्ये आता हा ट्रेंड असू शकतो. मात्र मला नक्कीच जाड दिसायला आवडणार नाही. आणि मला जाड लोक अजिबात आवडत नाही. जे स्वतः च्या शरीराची काळजी नाही घेऊ शकत त्यांची कीव येते.

करीना कपूरने बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. करण जोहर आणि करीना ची मैत्री सर्वांना परिचित आहेच. त्यावेळी देखील तिने विद्यावर तिच्या भूमिकेवरून कमेंट केली होती.

करणने करीनाला प्रश्न विचारला की, “जर तू एक दिवस सकाळी विद्याच्या जागेवर उठलीस तर तुला कसे वाटेल? त्यावर करीना म्हणाली होती की, मला डर्टी वाटेल. करीनाने विद्याच्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाच्या संदर्भात ही कमेंट केली होती

.