भयंकर ! म्हणून करिश्मा कपूरने नवऱ्याला सोडलं, म्हणाली गर्भवती असतांना देखील तो *** मारायचा…

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला.

पण दुर्दैवाने करिश्माचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर एकामागून एक करिश्माचे तब्बल 12 चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला होते. या अपयशामुळे करिश्मा खचून गेली होती. इतकी की, ती रात्ररात्र नुसती रडायची.  पदार्पणाच्या चार वर्षांनंतर करिश्माला यशाची चव चाखायला मिळाली.

1994 मध्ये आलेल्या ‘राजा बाबू’  या चित्रपटाने करिश्माला स्टार बनवले. पण आज ही स्टार बॉलिवूडमधून गायब आहे. 2012 मध्ये आलेल्या ‘डेंजरस इश्क’ यात ती अखेरची झळकली होती. 2002 मध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. पण हा साखरपुडा तुटला.

पुढे 2003 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले.  2016 मध्ये करिश्माने पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांच्या नात्याची अखेर खूप वादग्रस्त राहिली.  बातम्यांच्या रूपात हा वाद चव्हाट्यावर आला होता.

करिश्माने संजयवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटासाठी दाखल अर्जात तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. एक किस्सा तर इतका धक्कादायक होता की, तो ऐकून प्रत्येकाला धक्का बसला होता. गरोदर असताना संजयने त्याच्या आईला करिश्माच्या थोबाडीत मारण्यास सांगितले होते.

करिश्मा त्यावेळी प्रेग्नंट होती. प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजन बरेच वाढले होते. प्रसूतीनंतर संजयने करिश्माला एक ड्रेस घालायला सांगितला. पण जाड झाल्यामुळे तो ड्रेस करिश्माला फिट झाला नाही. हे पाहून संजय करिश्मावर प्रचंड संतापला होता. इतका की, हिला (करिश्माला)एक थोबाडीत मार, असे तो आपल्या आईला म्हणाला होता.

करिश्माने संजयवर असे अनेक आरोप केले होते. आजारी मुलाला सोडून तो पोलो खेळायला गेल्याचा आरोपही तिने केला होता. संजय त्याच्या भावाला करिश्मावर नजर ठेवायला सांगायचा. लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि मारायचा. सासू सुद्धा तिला मारायची, असे आरोपही करिश्माने केले होते.

हा सगळा त्रास व छळ असह्य झाल्याने अखेर करिश्माने संजयला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करिश्मा आई बबिता कडे येऊन राहू लागली. 201 6 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता.  पोटगीपोटी संजयने करिश्माला 10 कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे.