अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुख:चा डोंगर, पोस्ट शेअर करत झाला भावुक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कार्तिकच्या आजोबांचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कार्तिकने आपल्या आजोबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली आहे. यासोबतच कार्तिकने आपल्या आजोबांसारखा आपल्याला स्वॅग मिळावा अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.

कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या आजोबांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. बालपणीचा हा फोटो कार्तिकने शेअर केला आहे. लहान कार्तिक आजोहबांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. फोटोत कार्तिकचं वय अवघं एक-दोन वर्षांचं असल्याचं दिसत आहे. त्याच्या आजोबांनी सूट घातला आहे, तर कार्तिक आर्यन लाल स्वेटर घातला आहे.

हा फोटो शेअर करत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ”मी इच्छितो की, मीही तुझ्यासारखा होईन. तुमच्या आत्म्यास शांती लाभो नानू’. यासोबतच कार्तिकने हार्ट शेप इमोजीही यासोबत शेअर केला आहे. कार्तिकच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि मित्र त्याचं सांत्वन करत आहेत. तसंच कार्तिकच्या आजोबांच्या आत्म्याच्या शांती मिळावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.

कार्तिक आर्यन लवकरच ‘भूल भुलैया 2’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी, परेश रावल, राजपाल यादवही त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत असतील. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बाझमी करत आहेत. हा चित्रपट 2009मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा सिक्वल आहे.

विशेष म्हणजे कार्तिक आर्यन हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कार्तिक आर्यनचं पूर्ण नाव कार्तिक आर्यन तिवारी आहे. चित्रपटसृष्टी आल्यानंतर त्याने आपलं नाव बदलून कार्तिक आर्यन ठेवलं. कार्तिकच्या वडिलांचे नाव मनीष तिवारी आणि आईचे नाव माला तिवारी असं आहे. कार्तिकला एक बहीण कृतिका तिवारी देखील आहे जी पेशाने डॉक्टर आहे.