‘या’ ट्रिटमेंटमुळे बदलला कतरिना कैफचा चेहरा? पाहून बसेल धक्का

मनोरंजन क्षेत्रातील कोणत्याही कलाकारासाठी सौंदर्य हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. अभिनेत्री असो की, अभिनेते प्रत्येकजण वय मागे ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया, इंजेक्शन्स, हानिकारक उत्पादने वापरण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.

अलीकडेच, पोन्नियिनी सेल्वनच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, ऐश्वर्या राय बच्चन देखील ट्रोल झाली कारण तिचा चेहरा बदलेला दिसत होता. आपला चेहरा अधिक सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रीने बोटॉक्सचा सहारा घेतल्याचा काहींचा अंदाज आहे. आता या यादीत सौंदर्यवती कतरिना कैफचं नाव घेतलं जात आहे.

खरंतर, कॅटने नुकतीच स्वतःची एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर आणि तिच्या वयाच्या निम्मी दिसत आहे. तिचा चेहरा पूर्वीपेक्षा पातळ दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स कतरिनाच्या चेहऱ्यावर काहीतरी केल्यासारखं दिसतंय अशी कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘बोटॉक्स सीस मोअर द लिमिट’, दुसऱ्याने लिहिलं, चेहऱ्यावर काही केल्यासारखं का वाटत आहे?

आम्ही तुम्हाला सांगतो, कतरिना लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत एका हॉरर कॉमेडी, फोन भूतमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय तिच्याकडे मेरी ख्रिसमस आहे. ज्यात ती साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत, मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ मध्ये सलमान खानच्या विरुद्ध आणि फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्येही तिच्या लिस्टमध्ये दिसणार आहे.