अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न आहेत. विकी कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना कैफ पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रंगली आहे. विकी आणि कतरिना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात.
आता देखील विकीने कतरिनासोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे दिसून येत आहे, की दिवसागणिक त्यांच्यातील नातं घट्ट होत आहे. कतरिनाने एका वेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
फोटोमध्ये कतरिना आणि विकीने सन ग्लासेस घातले आहेत. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर चाहते देखील त्यांच्या फोटोंवर भरभरून कमेंट आणि लाईक्स करत आहेत.
लव्हबर्ड्सने त्यांच्या नवीन घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते, जिथे त्यांचे जवळचे मित्र आले होते. पार्टीत कटरिनाने मिनिमलिस्ट लुक असलेला मल्टीकलर ड्रेस परिधान केला होता. त्याच वेळी, विकीने शर्ट आणि पॅंटसह आपला लूक कॅज्युअल ठेवला.
कटरिनाने ‘झिमरमन’ ब्रँडचा पोस्टकार्ड लँटर्न मिनी ड्रेस घातला होता ज्याची किंमत 64,085 रुपये आहे. त्याचवेळी विकीने स्काय ब्लू कलरच्या शर्ट आणि फिकट पिवळ्या कलरच्या पॅन्टमध्ये त्याच्या लेडीलव्हशी मॅच केेले होते.
यापूर्वी, 20 डिसेंबर 2021 रोजी, कटरिना कैफने तिच्या इन्स्टा स्टारवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिचा आणि विकीचा हात दिसत होता. दोघांनी एकमेकांचा हात धरलेेेला दिसत आहे. मात्र, ते कट्रिना आणि विकीच्या नव्या घराचे चित्र होते. फोटो शेअर करत तिने लिहिले होते की, “होम.” यासोबतच अभिनेत्रीने हार्ट शेपचा इमोजीही दिला आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे राजस्थानमध्ये ९ डिसेंबर २०२१ रोजी शाही पद्धतीने लग्न झाले. त्यानंतर तो हनीमूनलाही गेला होता. मात्र, या जोडप्याने परतल्यानंतर कोणतीही रिसेप्शन पार्टी ठेवली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आता दोघेही लग्नाचे कोणतेही सेलिब्रेशन करणार नाहीत.
