लागीर झालं जी मालिकेतील पुष्पा मामीचा आताच ग्लॅमरस आणि बोल्ड अवतार बघून थक्क व्हाल.. फोटोज होतायत व्हायरल..

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. ‘लागीरं झालं जी’ ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मागील वर्षी या मालिकेने आपला निरोप घेतला.

ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती आज्या आणि शितली यांच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीमुळे. शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण यांनी निभावलेली ही पात्रं प्रेक्षकांची फेवरेट ठरली. अशातच अजून एक पात्रं लोकांना खूप आवडलं होतं ते म्हणजे आज्याची मामी.

ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती आज्या आणि शितली यांच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीमुळे. शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण यांनी निभावलेली ही पात्रं प्रेक्षकांची फेवरेट ठरली. अशातच अजून एक पात्रं लोकांना खूप आवडलं होतं ते म्हणजे आज्याची मामी. या पात्राने देखील कमी काळात खूप प्रसिद्धी मिळवली.

आज्या च्या मामीचे हे पात्र अभिनेत्री विद्या सावळे यांनी साकारले होते. त्यांनी 1 वर्ष उत्तमरित्या अभिनय केला होता. नंतर त्यांचे निर्मात्या सोबत काहीतरी वाद झाल्याने त्यांनी मालिकेतून माघार घेतली होती. पण त्यांचा अभिनय व मामी हे पात्र प्रेक्षकांनी खूपच पसंत केले

“लागिर झालं जी” मालिकेतून अचानक बाहेर पडलेल्या मामी नंतर काय करीत आहेत हे प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा होती. काही महिन्याच्या विश्रांती नंतर विद्या सावळे यांनी कलर्स मराठी या वाहिनीवरील “जीव झाला येडा पीसा” या मालिकेत काम करायला सुरुवात केली. या मालिकेत त्यांनी शिवाची आई मंगलची भूमिका निभावली आहे.

विद्या जी जसे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तसेच त्या आता त्यांच्या मॉडर्न फोटोग्राफी मुळे पण चर्चेत आहेत. नेहमी साडीत दिसणाऱ्या विद्या सावळे यांचा मॉडर्न अवतार पाहून त्या एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रीला मागे टाकणार असेच वाटत आहे.

शालेय जीवनापासूनच अभिनयाचा छंद जोपासलेल्या येथील विद्या सावळे या युवतीचा छोट्या रंगमंचापासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास काही दिवसातच रूपेरी पडद्यावर पोहोचला. नाट्यकलावंत ते सिनेअभिनेत्री असा प्रवास करणारी विद्या “सुपर्ब प्लान’ या मराठी चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली. हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला.

विद्या हिने महाविद्यालयीन जीवनात अभिनयाचा ठसा उमटवला. नाट्यक्षेत्रातून हा प्रवास रूपेरी पडद्यावर पोहोचला. सहकलाकार म्हणून विद्याची भूमिका असलेला “सुपर्ब प्लान’ हा मराठी चित्रपट मर्डर मिस्ट्री प्रकारचा होता. दिग्दर्शक जय तारी पटकथा लेखक डॉ. सुधीर निकम यांच्यामुळे तिला या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. विद्या या चित्रपटातील एका खटल्यात सहतपास अधिकारी असलेल्या निकिता निकमच्या भूमिकेत होती.

नाटक,चित्रपट या क्षेत्रात काम करताना भूमिका छोटी की मोठी याचा कधी विचार केला नाही. आपल्याला जी भूमिका मिळाली त्यात समरस होऊन त्याला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. एखाद्या भूमिकेच्या माध्यमातून समाजाला काही चांगला संदेश देता यावा, त्या अभिनयाची छाप पडावी, अशी कलाकारांची इच्छा असते. तशा भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. कामावर निष्ठा असल्यास ध्येयापर्यंत पोहोचणे अवघड नाही,
असे मला वाटते