ज्याने दिली चित्रपटात संधी, त्याच्याच प्रेमात वेडी होती माधुरी.. पण त्याच्यावर वाईट वेळ येताच दुसऱ्याच अभिनेत्यासोबत ठेवले संबंध..

माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या

80 च्या दशकात माधुरी दीक्षितची गणना इंडस्ट्रीच्या टॉप मॉडेलमध्ये होत होती. ‘तेजाब’ आणि ‘दिल’ यांसारखे ब्लॉकबस्टरस तिच्या नावावर होते. 1991 साली आलेल्या ‘साजन’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिटही ठरला. आणि माधुरीने बॉलीवूड मध्ये आपले वर्चस्व दाखवून दिले.

माधुरी दीक्षित आणि मिथुन चक्रवर्ती आजकाल दोन्ही दिग्गज स्टार सध्या फिल्मपासून दूर आहेत. मिथुन चक्रवर्ती हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. तर त्याचवेळी माधुरी दीक्षित ही तिच्या पतीसमवेत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. एकेकाळी माधुरी आणि मिथुन चक्रवर्ती दोघेही इंडस्ट्रीचे सुपरस्टार्स होते.

आजही या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. माधुरीने मिथुन चक्रवर्ती सोबत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. या दोघांच्या पडद्यावरील जोडीला चांगलीच पसंती मिळाली. माधुरीच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत मिथुन दा ने माधुरी ला खूप मदत केली होती.

परंतु असे असूनही एक वेळ अशी आली होती जेव्हा माधुरीने मिथुनबरोबर काम करण्यास नकार दिला होता. होय, ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीमुळे माधुरी ला बॉलिवूड मध्ये स्थान मिळाले, यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मात्र त्यालाच तिने नकार दिला. याची प्रचिती खुद्द मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलाखतीत दिली. ही गोष्ट 80 च्या दशकातील आहे, जेव्हा माधुरी चित्रपटांत करिअर करण्यासाठी धडपडत होती.

त्यावेळी माधुरीचे सेक्रेटरी रिक्कू राकेश नाथ चित्रपट निर्मात्यांपेक्षा कलाकारांच्या अधिक जवळीक करत असत. माधुरीसाठी हे सर्व तो करत असे. तत्कालीन एखाद्या टॉप च्या अभिनेत्याला माधुरीची छायाचित्रे दाखवायचे जेणेकरून त्या काळातील यशस्वी कलाकार निर्मात्यांना माधुरीला चित्रपटात घेण्यास सांगतील. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीवर वर्चस्व राखले होते. ते इंडस्ट्रीमधील सुपरस्टार होते. आणि अनेक निर्माते त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असायचे.

मिथुनच्या असलेल्या स्टारडम मुळे कोणीही त्याचा शब्द मोडत नसे. एक दिवस रिक्कू राकेश नाथ यांनी मिथुन चक्रवर्ती यांना माधुरीचा फोटो दाखवला आणि तिला त्यांच्या चित्रपटात घेण्याची विनंती केली. मिथुन यांनाही माधुरी दीक्षितचे फोटोज खूप आवडले, म्हणून त्यांनी त्यांच्या एका चित्रपटात नायिका म्हणून साइन केले. त्यांनी सर्व निर्मात्यांना माधुरीला चित्रपटात घेण्यास सांगितले.

अशाप्रकारे मिथुन चक्रवर्ती यांनी जवळपास डझनभर चित्रपटात माधुरीला हिरोईन बनवले. पण लोकप्रियता येताच माधुरीने मिथुनपासून अंतर बनवायला सुरुवात केली. एक काळ असा आला की तिने मिथुनबरोबर चित्रपटांची ऑफरदेखील फेटाळून लावली. असं म्हणतात की त्यावेळी तिने मिथुनला नकार देऊन अनिल कपूरबरोबर एकत्र काम केले होते.

त्यामुळे अनिल कपूरमुळे ती इतर स्टार्सबरोबर काम करण्यास तयार नव्हती. माधुरी दीक्षित आणि अनिलची जोडीही पडद्यावर खूप पसंत पडली होती. या दोन्ही स्टार्सनी एकत्र अनेक हिट चित्रपटही दिले आहेत.