महिमा चौधरीचं ‘त्या’ रात्री घडलेल्या एका घटनेमुळे झालं करिअर बरबाद.. केला धक्कादायक खुलासा..

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, जीने बर्‍याच काळापासून चित्रपटांपासून विश्रांती घेतली आहे आणि फिल्म इंडस्ट्रीच्या चंदेरी दुनियेतून स्वतःला दूर ठेवलं होतं, तिची काही छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिमा चौधरी तिच्या अदाकारीने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ करत आहे.

1997 मध्ये महिमा चौधरी यांनी शाहरुख खान सोबत सुभाष घईच्या परदेससह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याची गाणी अजूनही चाहत्यांच्या ओठावर आहेत. परदेस नंतरही महिमा काही चांगल्या स्क्रिप्ट्स घेण्यास यशस्वी ठरली होती परंतु २०१० नंतर मात्र तिने शोबिजमधून ब्रेक घेतला.

गेल्या दशकभरात तिने इव्हेंट आणि लाइव्ह शो करणे सुरूच ठेवले परंतु तिला त्यात हवा तसा रिस्पॉन्स मात्र मिळाला नाही. ती बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतुन बऱ्यापैकी गायबच झाली. आजही एखाद्या अवार्ड शो मध्ये महिमा झळकताना दिसून येते.

एका खाजगी मुलाखतीत गप्पा मारताना महिमाला विचारले गेले की २०१० नंतर तिने चित्रपटांपासून ब्रेक का घेतला? यावर महिमाने म्हटले की एकदा लग्न झालं की बॉलिवूड मध्ये काम मिळणं कठीण होत जातं. “त्यावेळी हे स्पष्ट झाले होते की एखादी अभिनेत्री विवाहित असल्यास तिच्याकडे खूप कमी ऑफर्स येतात.

तरी अश्या अनेक अभिनेत्र्या आहेत ज्यांनी लग्नानंतर ही काम सुरू ठेवलं जसं शर्मिला टागोर जी, रेखा जी, शबाना आझमी जी. त्यांनी आपले काम चालू ठेवले. पण तरीही एखाद्या अभिनेत्रीने लग्न करणे तिच्या करिअर च्या दृष्टीने खूप मोठी रिस्क होती . “

ती पुढे म्हणाली, “मी असो किंवा करिश्मा, दोघींसोबत असंच झालं होतं. मला इंडस्ट्रीने अगदीच डावलले नाही पण मी एक कुटुंब सुरू करण्यास उत्सुक होते, त्यामुळे मी आनंदी होते. दरम्यान मी कार्यक्रम व टेलिव्हिजन केले. चांगले चित्रपट आले नाहीत, तर काही आले पण मनासारखे रोल नसल्यामुळे मी नाकारले. “

महिमा ने या मुलाखतीत पुढे बोलताना सांगितले कि जेंव्हा ती ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंग साठी बंगळुरू मध्ये होती तेंव्हा तेथे तिच्या कारला एक ट्रकने जोरदार धडक दिली. ही कार आणि ट्रक ची टक्कर इतकी भयंकर होती की कारच्या काचेचे तुकडे महिमाच्या चेहऱ्यावर रुतले होते. या भयंकर दुर्घटनेमुळे महिमाचा पूर्ण चेहरा खराब झाला होता असे तिने सांगितले.

महिमा म्हणाली, त्यावेळी तिथे तिला कोणीही मदत केली नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आला. जेंव्हा महिमा शुद्धीत आली तेव्हा तिचा चेहरा इतका खराब झाला होता कि ती स्वतःचाच चेहरा आरश्यात पाहून घाबरून गेली. आणि तिला वाटले कि आता चेहरा खराब झाल्यामुळे तिला कोणीही काम देणार नाही.

त्यानंतर महिमा या दुःखातून सावरली आणि 2006 मध्ये तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केले, परंतु त्यांच्या लग्नाच्या काहीच वर्षांनंतर म्हणजेच 2013 मध्ये महिमा आणि बॉबी मुखर्जी हे एकमेकांपासून वेगळे झाले. या दोघांना एक मुलगी आहे तिचे नाव एरियाना आहे आणि ती आता महिमा सोबत राहत आहे. माहीम आता एकटीच एरियानाची काळजी घेत आहे.