वयाच्या 48व्या वर्षीदेखील या अभिनेत्रीचा आहे एक 25 वर्षीय तरुणी सारखा बो-..

बॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात वावरणाऱ्या नट- नट्यांना कायमच आपला लूक आणि फिटनेस यांची काळजी घ्यावीच लागते. एखाद वेळेस नट आपल्या कलेच्या जोरावर या सगळ्या गोष्टींना डावलून पुढे जाऊ शकतो परंतु अभिनेत्र्यांना मात्र आपला लूक आणि फिटनेस जपावीच लागते. अन्यथा या स्पर्धेत त्यांचा निभाव लागणं कठीणच होऊन जातं.

इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखादी नवीन अभिनेत्री पाऊल ठेवते तेव्हा तिला आपली फिगर म्हणजेच शरीरयष्टी सडपातळ ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावीच लागते. आज आपण अशाच एका बॉलिवूड सुंदरी बद्दल बोलणार आहोत जिने एक आयटम डान्सर म्हणून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं आणि अनेकांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडली.

इतकंच नाही तर अभिनेत्री सध्या 48 वर्षांची आहे आणि 2 मुलांची आई आहे तरीही तिचा एखाद्या 25वर्षाच्या तरुणीसारखा बोल्ड लूक आहे. आणि सध्या बॉलीवूड मध्ये टॉप सेलिब्रिटी पैकी एक आहे. चला तर जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री.

आम्ही बोलत आहोत मलायका अरोरा बद्दल. बॉलीवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये मलायकाच्या नावाचा समावेश होतो. मलायका 48 वर्षांची आहे. पण तिच्याकडे बघून असे वाटते की, ती जणू 25 वर्षांची तरुणी आहे. म्हणूनच आजही मलायकाचे करोडो चाहते आहेत

आज आम्ही तुम्हाला मलायकाच्या फिटनेसचे रहस्य सांगणार आहोत. ती तिच्या फिटनेसची खुप जास्त काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती रोज अनेक गोष्टी करत असते. यातल्याच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मलायका तिच्या स्किनची काळजी घेते. तिला बाजारातील सौंदर्य प्रसाधनांवर विश्वास नाही. त्यामूळ ती तिच्या त्वचेसाठी घरातच औषधे बनवते. त्यासाठी ती हळद, ऑलोवेरा जेल, कोरफड या गोष्टींचा उपयोग करते. ती फेस मास्कसाठी टॉमेटो, पपई याचा वापर देखील करतात.

मलायका तिच्या त्वचेवर ग्लो आणण्यासाठी रोज बर्फाचा वापर करते. शुटींगमध्ये थकवा आल्यानंतर ती बर्फांच्या तुकड्यांचा मास्क म्हणून वापर करते. त्यामूळे तिची स्कीन चमकते. तिला त्वचेसाठी घरगुती उपाय करायला खुप आवडतात.

फिट राहण्यासाठी मलायका रोज सकाळी व्यायाम करते. त्यासोबतच ती जिमला देखील जाते. रोज तीन तास ती तिच्या शरीरावर खर्च करते. त्यामूळे तिची फिगर एवढी सुंदर आहे. दररोज अनेक गोष्टी केल्यानंतर आणि अनेक तास व्यायाम केल्यामूळे मलायका हॉट आणि ग्लॅमर्स दिसते.

48 वर्षांची मलायका फिटनेस प्रेमी आहे. ती जिममध्ये वर्कआउटव्यतिरिक्त योगादेखील करते. मलायका डाएटचे लक्ष ठेवण्याबरोबर फिट राहण्यासाठी आउटडोअर स्पोर्ट्स खेळते. रोज अर्धा तास स्विमिंग, सायक्लिंग आणि जॉगिंगदेखील करते.

फिटनेस शेड्यूलमध्ये योगा, डान्स, वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंगदेखील सामील आहेत. मलायकाने मुंबईमध्ये दीवा योगा नावाचा योगा स्टूडियोदेखील सुरु केला आहे.

.