बॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात वावरणाऱ्या नट- नट्यांना कायमच आपला लूक आणि फिटनेस यांची काळजी घ्यावीच लागते. एखाद वेळेस नट आपल्या कलेच्या जोरावर या सगळ्या गोष्टींना डावलून पुढे जाऊ शकतो परंतु अभिनेत्र्यांना मात्र आपला लूक आणि फिटनेस जपावीच लागते. अन्यथा या स्पर्धेत त्यांचा निभाव लागणं कठीणच होऊन जातं.
इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखादी नवीन अभिनेत्री पाऊल ठेवते तेव्हा तिला आपली फिगर म्हणजेच शरीरयष्टी सडपातळ ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावीच लागते. आज आपण अशाच एका बॉलिवूड सुंदरी बद्दल बोलणार आहोत जिने एक आयटम डान्सर म्हणून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं आणि अनेकांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडली.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. बॉलीवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये मलायकाच्या नावाचा समावेश होतो. मलायका ४७ वर्षांची आहे. पण तिच्याकडे बघून असे वाटते की, ती २५ वर्षांची तरुणी आहे. म्हणूनच आजही मलायकाचे करोडो चाहते आहेत
मलायका अरोरा तिच्या सोशल मीडियारील अॅक्टिव्हिटीजमुळे बर्याचदा चर्चेत राहते. सर्वांनाच माहिती आहे की ती तिच्या फिटनेसकडे ती सर्वाधिक बारकाईने लक्ष देते. पण सध्या मलायका चर्चेत आहे ते एक वेगळ्याच कारणामुळे. चला तर जाणून घेऊयात काय आहे किस्सा.
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सोबत घडलेल्या एका किस्सामुळे चर्चेत आली आहे. जो तीने स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की जेव्हा ती एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेली होती आणि रीर्टन टेबलाजवळ पोचली तेव्हा तिने पाहिले की ती पँट घालण्यास विसरली आहे. चला तर मग संपूर्ण किस्सा काय आहे ते जाणून घेऊया.
वास्तविक मलायका अरोराने आपल्या इंस्टा स्टोरीवर एक नव्हे तर 2 स्टोरीज शेअर केल्या होत्या. पहिल्या कथेत तीने एक विनोद शेअर केला. ” आधी जेव्हा घरी कोणी पाहुणे यायचे तेव्हा त्यांना सांगावं लागायचं की घाबरू का, आम्ही आमच्या कुत्र्याला लस दिली आहे. पण आता करोना काळात कोणी आलं तर मी म्हणते, घाबरू नका, मी ही लस घेतली आहे.”
दुसऱ्या स्टोरी मध्ये मलायकाने आपल्या सोबत घडलेला एक विचित्र किस्सा सांगितला. मलायका अरोराने रेस्टॉरंटमध्ये घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणते की एकदा ती एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेली होती. जेथे तीने कोपराच्या मदतीने दरवाजा उघडला, पायाने शौचालयाची सीट वर केली. टिश्यू पेपरच्या मदतीने पाण्याचा स्प्रे वापरला पुन्हा कोपर लावून दरवाजा बंद केला आणि जेव्हा ती टेबलाकडे परत आली तेव्हा तिला जाणवले की ती आपली पँट वर करायला विसरली आहे. मलायका अरोराने ज्या प्रकारे बाथरूम वापरला आहे, त्यावरून तिला कोरोनाची खूप भीती वाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सन 2020 मध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह झाली होती.
ज्यानंतर तिला यापुढे पुन्हा चूक करण्याची इच्छा नव्हती. अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह असताना 15 दिवस होम क्वायरन्टाईनमध्ये राहिली. दरम्यान ती बरीच कंटाळली होती. बॉलिवूड जगतामध्ये आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. होय कारण प्रत्येकाला त्यांच्या प्रेम प्रकरणाचाबद्दल माहित झाले आहे आणि जेव्हापासून मलायका अरोराने अरबाजशी घ-टस्फो-ट घेतल्यानंतर मलायका बर्याच ठिकाणी अर्जुनबरोबर दिसली होती, त्यानंतर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे हे दोघेही चर्चेत आहेत.
