बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतेच. मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीची अशी एक अभिनेत्री आहे जिची गणना हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. मलायका कधीकधी तिच्या बोल्ड फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तर कधी कधी ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत सुंदर फोटो शेअर करत असते.
अलीकडेच मलायकाने तिच्या बेडरूम मधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे आगीसारखे पसरत आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत दिसत आहे. वास्तविक, नुकताच मलायका अरोराने तिच्या बेडरूमचा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोत मलायकाच्या बेडरूममध्ये ठेवण्यात आलेल्या काही फोटो फ्रेम्स दिसत होत्या. या फोटो फ्रेम्समध्ये मलायका अर्जुन कपूरसोबत खास पोज देताना दिसत आहे. मलायकाच्या बेडरूममधील हे फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. आणि चाहत्यांनाही ते खूप आवडले आहेत.
यासोबतच या जोडीचे खूप कौतुकही केले जात आहे. मात्र, मलायकाने तिच्या बेडरूममधील फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने अनेकदा तिच्या बेडरूमचे व्हिडिओही शेअर केले आहेत. याशिवाय मलायका अनेकदा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते.
अलीकडेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे सुंदर फोटो शेअर केले होते. जे चाहत्यांना खूप आवडले होते. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले आहे. आणि त्यांच्या लग्नाच्या अफवा यापूर्वीही पसरल्या होत्या. मात्र, अर्जुन कपूरने यावेळी सांगितले होते की, जेव्हाही तो लग्न करेल तेव्हा चाहत्यांना याबद्दल नक्कीच सांगेन.
अर्जुन कपूर लवकरच ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी आणि तारा सुतारिया आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अर्जुन कपूर लवकरच ‘कुत्ते’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर पोलीस हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
याशिवाय अर्जुन कपूरकडे ‘द लेडी किलर’ देखील आहे ज्यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.