प्रेमापोटी संजय दत्तने ‘या’ अभिनेत्रीच्या सी ग्रेड चित्रपटांच्या डीव्हीडी रातोरात केल्या मार्केट मधून गायब..

‘बॉलिवूड’ नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही कायमच चर्चेचा विषय ठरलेली आहे. ही इंडस्ट्रीच इतकी मोठी आहे की रोज काहीना काही घटना घडत असतात व प्रसार माध्यमांद्वारे त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पण तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही बर्याच प्रेक्षकांना माहीत नाही आहेत.

बॉलिवूड मध्ये काम करणारे कलाकारच नाही तर त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीयही कायमच लोकांच्या नजरेत असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा एका स्टार पत्नी बद्दल, जीने आपल्या करिअरची सुरुवात सी ग्रेड चित्रपटातून केली, पण नंतर तिने एक दिग्गज अभिनेत्यासोबत लग्न केलं.

होय आम्ही बोलत आहोत ‘मान्यता दत्त’ बद्दल. मान्यता दत्त ही बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त याची पत्नी असुन दिग्गज दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची सून आहे. इंडस्ट्रीमध्ये संजय-मान्यता या जोडप्याचे अनेक चाहते आहेत परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की संजय हा मान्यताचा दुसरा पती आहे.

तसेच मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे. संजय दत्तचे पहिल्यांदा लग्न रिचा शर्मा सोबत झाले होते जिचे लग्नाच्या काही वर्षांनंतर नि-ध-न झाले. या धक्क्यातून सावरत संजय ने रिया पिल्लई सोबत दुसरे लग्न केले. पण लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

अखेर 2006च्या काळात संजयच्या आयुष्यात मान्यताचं आगमन झालं. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर हळू हळू प्रेमात झाले. नंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. आणि अखेर 7 फेब्रुवारी2008 साली दोघे विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संजय दत्त सोबत मान्यताचे हे पहिले लग्न नाही. 2003 साली तिचे मिरज-उल रहमान नावाच्या एका सामान्य व्यक्तीशी लग्न झाले होते. मात्र, नंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर संजय तिच्याआयुष्यात आला आणि हे दोघे कायमचे एक झाले. मानयता संजयपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या प्रेमकथाही खूप रंजक आहेत.

मान्यता दत्तने ‘लव्हर्स लाईक अस’ या सी ग्रेड चित्रपटामध्ये काम केले होते. संजय दत्तला ही गोष्ट जेव्हा माहीत पडली तेव्हा त्याला खूप राग आला. त्या चित्रपटाच्या सीडी आणि डिव्हीडी मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. त्यामूळे संजय दत्तने आपले सूत्र आणि ओळख वापरुन मार्केटमधून त्या सीडीज रातोरात गायब केल्या. संजयने अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे की संजयच्या आयुष्यात मान्यताचे खूप मोठे योगदान आहे. संकटाच्या वेळी संजयला ओळखून तिने खूप पाठिंबा दर्शविला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे. या चित्रपटाच्या नंतर मान्यता संजू बाबाच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली.