पहिला नवरा गरीब म्हणून त्याला सोडून ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर केलं दुसरं लग्न.. आता आहे करोडोंची मालकीण.

‘बॉलिवूड’ नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही कायमच चर्चेचा विषय ठरलेली आहे. ही इंडस्ट्रीच इतकी मोठी आहे की रोज काहीना काही घटना घडत असतात व प्रसार माध्यमांद्वारे त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पण तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही बर्याच प्रेक्षकांना माहीत नाही आहेत.

बॉलिवूड मध्ये काम करणारे कलाकारच नाही तर त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीयही कायमच लोकांच्या नजरेत असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा एका स्टार पत्नी बद्दल, जीचा आधीचा पती गरीब होता पण नंतर तिने एक दिग्गज अभिनेत्यासोबत लग्न केलं.

होय आम्ही बोलत आहोत ‘मान्यता दत्त’ बद्दल. मान्यता दत्त ही बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त याची पत्नी असुन दिग्गज दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची सून आहे. इंडस्ट्रीमध्ये संजय-मान्यता या जोडप्याचे अनेक चाहते आहेत परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की संजय हा मान्यताचा दुसरा पती आहे.

तसेच मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे. संजय दत्तचे पहिल्यांदा लग्न रिचा शर्मा सोबत झाले होते जिचे लग्नाच्या काही वर्षांनंतर नि-ध-न झाले. या धक्क्यातून सावरत संजय ने रिया पिल्लई सोबत दुसरे लग्न केले. पण लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

अखेर 2006च्या काळात संजयच्या आयुष्यात मान्यताचं आगमन झालं. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर हळू हळू प्रेमात झाले. नंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. आणि अखेर 7 फेब्रुवारी2008 साली दोघे विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला

संजयने अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे की संजयच्या आयुष्यात मान्यताचे खूप मोठे योगदान आहे. संकटाच्या वेळी संजयला ओळखून तिने खूप पाठिंबा दर्शविला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे. या चित्रपटाच्या नंतर मान्यता संजू बाबाच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली.

संजय बर्‍याचदा चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो, अशा परिस्थितीत ती एकटीच आपल्या घराची आणि दोन्ही मुलांची काळजी घेते. २२ जुलै १९७९ रोजी मुंबईत जन्मलेल्या मानयता यांचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. मान्यताने आपले बालपण दुबईमध्ये घालवले आहे. नंतर ती अभिनयाची आवड असल्यामुळे मुंबईत आली.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संजय दत्त सोबत मान्यताचे हे पहिले लग्न नाही. 2003 साली तिचे मिरज-उल रहमान नावाच्या एका सामान्य व्यक्तीशी लग्न झाले होते. मात्र, नंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर संजय तिच्याआयुष्यात आला आणि हे दोघे कायमचे एक झाले. मानयता संजयपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या प्रेमकथाही खूप रंजक आहेत.

जेव्हा मान्यताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा ती सारा खान म्हणून ओळखली जात होती. 2003 मध्ये आलेल्या ‘गंगाजल’ या चित्रपटात तिने आयटम नंबर केला होता. यानंतर तिला नाव मान्यता असे नाव पडले. 2006 च्या सुमारास संजय आणि मानयता यांची भेट झाली. हे दोघेही एका अ‍ॅवॉर्ड शूमध्ये एकत्र दिसले होते.

या दरम्यान संजय दत्तचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये तो एका मित्रासोबत तिला भेटवतो आणि म्हणतो की मी लवकरच या मुलीशी लग्न करणार आहे. त्यानंतरच 2008 मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर संजय आणि मान्यता यांनाही दोन मुले झाली. एक मुलगा शरण दत्त आणि एक मुलगी इकरा दत्त.