ऑस्ट्रेलियाचा हा प्रसिद्ध खेळाडू करणार भारतीय मुलीशी लग्न, जाणून घ्या त्या क्रिकेटपटूचे नाव

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीनंतर आणखी एक परदेशी क्रिकेटपटू भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. हसन अलीने दुबईमध्ये भारताच्या सामिया आरझू बरोबर लग्न केले. सामिया हरियाणाची असून ती गेल्या तीन वर्षांपासून एअर अमिरातमध्ये कार्यरत आहे. वृत्तानुसार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू लवकरच भारतीय महिले सोबत विवाहात अडकणार आहे.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल भारतीय सेलिब्रिटी विनी रमनबरोबर वारंवार दिसत आहे. वृत्तानुसार तर दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, हे दोघे लग्न कधी करणार हे अद्याप समोर आलेले नाहीये.

विनी रमन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनची छायाचित्रे बर्‍याचदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मॅक्सवेल आणि विनी ने स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे.

हसन अली नंतर ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारतीय मुलीशी लग्न करू शकेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय वंशाच्या एका महिलेशी लग्न केले आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन हे दोघे लग्नाबद्दल कधी निर्णय घेतील याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.