कधीकाळी सुपस्टार राहिलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची पहा काय झालीये ‘अवस्था’, फोटो पाहून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये ऐंशीच्या दशकामध्ये अनेक अभिनेत्रींनी आपले नशीब आजमवायला सुरुवात केली होती. यामध्ये जयाप्रदा त्यावेळी आघाडीची अभिनेत्री होती.त्यामुळे अनेक अभिनेत्री आपले नशीब आजमावण्यासाठी बॉलिवूडमध्ये येत होत्या. मात्र, जुन्या अभिनेत्री या नवीन अभिनेत्रीला त्रास देण्याचे धोरण अवलंबत होत्या.

अनेक दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटात घेण्यास मज्जाव करत होत्या. तसेच त्यांच्यावर दबाव देखील टाकत होत्या.आम्ही आपल्याला आज एका अशाच अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत. सध्या तिने बॉलीवूड सोडून जपानमध्ये आपले बस्तान बसवलेले आहे.

तिथे ती एक डान्स इन्स्टिट्यूट चालवत असल्याची माहिती आलेली आहे. या अभिनेत्रीने सनी देओलपासून जॉकी श्रॉफ पर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. या अभिनेत्रीने त्याकाळी प्रचंड धुमाकूळ घातला होता.मात्र, आज तिला नृत्य शिकण्याची वेळ आलेली आहे. नुकताच ऋषी कपूर यांच्या सोबतचा तिचा एक फोटो शेअर केला आहे.

यामध्ये ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने दिसत आहे. तिला पाहिल्यानंतर कोणीही ओळखणार नाही. होय, आम्ही बोलत आहोत, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिच्याबद्दल.. मीनाक्षी शेषाद्री हिने बॉलिवूडमध्ये अनेक चांगले चित्रपट केले होते. त्यानंतर तिला आता बाहेर देशात जाऊन डान्स शिकवण्याचे काम करावे लागत आहे.

मीनाक्षी शेषाद्री हिने हिरो हा चित्रपट केला होता. हिरो या चित्रपटामध्ये भूमिका खूपच वेगळी होती. या चित्रपटानंतर तिने दामिनी हा चित्रपट केला होता. दामिनी मध्ये तिने साकारलेली भूमिका ही अत्यंत गाजली होती. यामध्ये तिला ऋषी कपूरची पत्नी दाखवण्यात आले होते. यामध्ये सनी देओल, अमरीश पुरी यांचे काम देखील होते.

त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. घातक, घायल या सारख्या चित्रपटात देखील तिने काम केले होते. हे चित्रपटही प्रचंड हिट ठरले होते. मीनाक्षी शेषाद्री एक प्रसिद्ध नृत्यांगना देखील आहे. ती कु, कथक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्य करते. ती सध्या 56 वर्षांची आहे. मीनाक्षी शेषाद्री हिने आपले बस्तान जपानमध्ये बसवले आहे. तिथे ती मुलांना नृत्य शिकवते.

ऋषी कपूर यांच्या सोबतचे तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ऋषी कपूर सोबत ती दिसत आहेत. या फोटोमध्ये तिला अनेक जण ओळखत नसल्याचे देखील समोर येत आहे.