मोहनीश बहलची पत्नी आहे इतकी सुंदर की तिच्यासमोर माधुरी पण वाटेल फिकी.. ‘या’ चित्रपटात केलं होतं काम..

सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला ‘साजन’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील एक चेहरा तुम्हाला आठवतं असेलच. तो म्हणजे मेनकाचा. होय, एकता सोहनी (Ekta Sohini)हिने या चित्रपटात मेनकाची भूमिका साकारली होती.

ही एकता आज कुठे आहे? तर अभिनेता मोहनीश बहलसोबत (Mohnish Bahl) सुखाने नांदतेय.एकताचे खरे नाव आरती होते. पण अभिनेते देवानंद यांच्या सांगण्यावरून तिने आपले नाव बदलून एकता ठेवले. आता ती पुन्हा एकदा आरती बहल याच नावाने ओळखली जाते.

एकता सोहोनी अभिनेता मोहनीश बहलची पत्नी असून तिने ‘वास्तव’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘संजीवनी 2’ मध्ये देखील  मोहनीश  आणि एकता  झळकले होते.  मोहनीश आणि एकता यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले आहेत. त्यांचे लग्न धुमधडाक्यात झाले होते.

सलमान आणि  मोहनीश  खूप चांगले फ्रेंड्स आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळे  मोहनीश लग्नात सलमानही हजर होता. खास म्हणजे त्याने त्याची त्यावेळेची प्रेयसी संगीता बिजलानीसोबत या लग्नाला हजेरी लावली होती.

एकताने ‘सोलाह सतरा’ या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिला खरी लोकप्रियता ‘अव्वल नंबर’ या चित्रपटामुळे मिळाली. एकताने वंश, तहलका, नामचीन, वास्तव, लाईफ हो तो ऐसी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

एकता आणि  मोहनीश यांना दोन मुली असून त्यांची मोठी मुलगी प्रनुतनला सलमान खानने दाने वर्षाआधी ‘नोटबुक’ या चित्रपटाद्वारे लाँच केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.