बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. सध्या ती लॉक अप या नव्या शोचं होस्टिंग करत आहे. या शोमध्ये घडणाऱ्या विविध घटना कायम चर्चेत असतात. या शोमध्ये दररोज काहीतरी नवीन घडतं ज्याने, हा शो वादात सापडतो.
लॉकअप शोचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लॉकअप शोचे स्पर्धक आप-आपसात तू तू मैं मैं करत आहेत. याच दरम्यान मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोराही तिथे येतात. भांडण सोडवताना मुनव्वर फारुकीचा हात अंजली अरोराच्या छातीवर जातो आणि अभिनेत्रीच्या प्राईवेट पार्टला लागतो.
मात्र, दोघंही काहीच झालं नाही असं चेहऱ्यावर दाखवतात.नुकतंच मुनव्वर फारुकी यांनी शोमध्ये सांगितलं होतं की, तो विवाहित आहे. जरी तो त्याच्या पत्नीसोबत राहत नाही. त्याच्यात आणि त्याच्या पत्नीमध्ये खटला सुरू आहे. याशिवाय त्यांना एक मुलगा असल्याचंही त्याने सांगितलं. हे ऐकून अंजली अरोराचं हार्टब्रेक झालं.
लव्हबर्ड्स की जस्ट फ्रेंड्स?
गेल्या काही दिवसांपासून या दोघांची केमिस्ट्री पाहता इंटरनेटवर या दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगत आहेत; मात्र या दोघांनीही आपल्यामध्ये केवळ चांगली मैत्री असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे दोघे खरंच फक्त मित्र आहेत, की पुढे लव्हबर्ड्स होतील हे लवकरच कळेल.