टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम प्रतीक सहजपाल सध्या कलर्सच्या ‘द खतरा’ शोमध्ये दिसत आहे. प्रतीक व्यतिरिक्त, निक्की तांबोळी, उमर रियाझ, युविका चौधरी, प्रिन्स नरुला यांच्यासह अनेक स्टार्स शोमध्ये दिसले आहेत.
या शोचे प्रोमोज सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ज्यामध्ये स्पर्धक खूप मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रतीक सहजपाल असे काही करताना दिसत आहे ज्यामुळे मुनमुन दत्ता स्वत:चे डोळे बंद करते.
प्रोमोमध्ये असे दिसत आहे की मुनमुन, भारती आणि हर्ष स्टेजवर उभे आहेत. भारती उमर आणि प्रतीकला एक टास्क देते ज्यामध्ये दोघांना मुनमुनला इंम्प्रेस करायचे असते. हे काम पूर्ण करण्यासाठी उमर आणि प्रतीक असे काही करायला लागतात की मुनमुन लाजते आणि डोळे बंद करते.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुनमुनला इम्प्रेस करण्यासाठी प्रथम प्रतीक शर्ट काढतो, त्यानंतर उमर देखील शर्ट काढतो. पण प्रतीक थांबत नाहीत. यानंतर प्रतीकने त्याची पॅन्टही काढायला सुरुवात करतो. मात्र या दोघांना हे करताना पाहून सर्वच चकीत होतात.
यामुळे होती चर्चेत
काही काळापूर्वी मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही खूप चर्चेला उधाण आलं होतं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये राज ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांवरून मुनमुनला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि अभिनेत्रीला ही गोष्ट आवडली नाही.
मुनमुनने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाºयांना चांगलंच सुनावलं होतं आणि राजसोबतच्या तिच्या अफेअरची बातमी खोटी असल्याचे सांगितलं होतं.