रात्रभर पार्टी केल्यानंतर ‘बबिता’ची चालायची पद्धत बदलली; लोक म्हणायला लागली पार्टीत रात्री गेम झाला…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता नेहमीच चर्चेत राहिली आहे. वादग्रस्त विधानं किंवा अफेअरच्या चर्चा यामुळे ‘बबिताजी’ची चर्चा होत असते. आता तिच्या एका व्हिडिओमुळे मुनमुन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. मुनमुनच्या या व्हायरल व्हिडिओवर युजर्स अनेक कमेट करत आहेत.

बबिता उर्फ मुनमुन एका पार्टीमधून बाहेर पडल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. एका पॅपाराझी इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटिझन्स त्यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत. तर हा व्हिडिओ चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे, नेटकऱ्यांचा असा अंदाज आहे की या व्हिडिओत बबिबा दारुच्या नशेत आहे. नेटकऱ्यांनी तशा कमेंट्सही केल्यात.

एका पार्टीमधून बाहेर आलेल्या मुनमुन पायऱ्या उतरत असताना आधार घेत घेत उतरत होती. त्यामुळे तिच्या या व्हिडिओवर नेटिझन्सनी कमेंट्स केल्या आहेत की तिने दारू प्यायली आहे का? तर काही युजर्स विचारत आहेत की ती प्रेग्नंट आहे का? ही अशी का चालते आहे असा सवालही अनेक युजर्स विचारतायंत. दरम्यान बबिताच्या काही चाहत्यांनी तिला पाठिंबा देत असेही म्हटले की, ती गरोदर असू दे किंवा दारुच्या नशेत, कृपया तिच्या मागे लागू नका.

तीही एक माणूस आहे आणि तिला हवं तसं आयुष्य एन्जॉय करण्याचा अधिकार तिला आहे. दरम्यान काही युजर्सच्या अशाही कमेंट्स आहेत की तिचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे मुनमुन अशी चालते आहे. तिच्या प्रेन्गन्सीबाबत किंवा तिने दारु पिण्याबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन तिच्या चाहत्यांनी केले आहे.

याआधीही चर्चेत राहिली आहे मुनमुन दत्ता

ही पहिलीच वेळ नव्हे की मुनमुन चर्चेचा विषय ठरली आहे. याआधीही अनेक वादांमुळे तिची चर्चा झाली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनाडकटसोबतच्या अफेअरमुळे मुनमुन चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी छायाचित्रकारांवरही ती भडकली होती, मुनमुनचा तो व्हिडिओ विशेष चर्चेत आलेला. दरम्यान त्याआधी मुनमुन अपघात झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. जर्मनीमध्ये असताना झालेल्या अपघातात तिला दुखापत झाली होती. दरम्यान अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ‘बबिता’ अनेकदा अडचणीतही सापडली आहे.