‘तो इतका खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो…’, हा अभिनेता चौथ्यांदा चढला…

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. महेश बाबू हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. सध्या महेश बाबू हा सध्या त्याचा सावत्र भाऊ नरेश बाबू याच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आहे. नरेश बाबू मूव्हीजनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड पवित्रा लोकेश सोबत लग्न करणार असल्याचा खुलासा केला आहे.

नरेश बाबूनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हा खुलासा केला आहे. नरेश बाबू चौथ्यांदा लग्न करणार असल्यानं या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी नरेश बाबूला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या तर काही नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. आता यावर नरेश यांची तिसरी पत्नी रम्या रघुपतीनेही प्रतिक्रिया दिली आहे. राम्या यांनी सोशल मीडियावर संपात व्यक्त करत म्हटले की, मी हे कधीही होऊ देणार नाही.

महेश बाबू यांचा सावत्र भाऊ नरेश बाबूनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी नरेश आणि पवित्रा एकत्र दिसत असून त्यांच्या आजूबाजुला रोमॅंटिक सेटअप आहे. ते सगळ्यात आधी केक कापतात आणि नंतर एकमेकांना केक भरवत किस करताना दिसत आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करत नरेश यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये नरेश आणि पवित्रा केक कापताना, एकमेकांना भरवताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये या दोघांचा मागे आकाशात फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी ‘लवकरच लग्न करणार’ असे लिहून नरेशने पवित्र नरेशलाही टॅग केले आहे. व्हिडिओ शेअर करताना नरेश यांनी लिहिले, ‘नवीन वर्ष. नवी सुरुवात. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नरेशचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या पत्नीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नरेश आणि पवित्राचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. नरेशची तिसरी पत्नी रम्या रघुपतीने या व्हिडिओवर आक्षेप घेतला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राम्या म्हणाली, ‘तो इतका खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो. तो चौथ्यांदा लग्न कसा करू शकतो? मी या दोघांना हे लग्न मुळीच करू देणार नाही. आमचा अजून घटस्फोट झालेला नाही. त्याने यापूर्वी तीन लग्ने केली आहेत, आम्हाला एक मूलही आहे.

राम्याने पुढे सांगितले की नरेशनं तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. नरेशनं रम्यावर दिवंगत सुपरस्टार कृष्णासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप केला होता आणि वेगळे होण्यास सांगितले होते. नरेशनं एक प्रेमपत्रही दाखवले होते, जे राम्यानं बनावट आणि खोटे असल्याचे सांगितले आणि त्यावर आपली सहीदेखील खोटी असल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी जुलैमध्येच राम्यानं नरेश आणि पवित्रा यांना हॉटेलमधून बाहेर पडताना लिफ्टमध्ये पकडले होते. राम्याने त्याला पाहताच चप्पलनं मारहाण करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.