स्टेजवर नवरदेव जवळ येताच बदलला नवरीचा मूड; लग्नातील VIDEO आला समोर

लग्नसमारंभादरम्यान अनेक अशा घटनाही घडतात ज्या आयुष्यभरासाठी लक्षात राहतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही शेअर केले जातात. कधी हे व्हिडिओ पोट धरून हसायला लावणारे असतात तर कधी हैराण करणारे असतात. व्हिडिओमध्ये कधी कधी अजब घटना आणि हावभावही कैद होतात.

सोशल मीडियावर सध्या नवरदेव आणि नवरीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला विचित्रही वाटेल आणि हसूही येईल. सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नातील रील्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. असाच एक नवरीबाईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ही नवरी आपल्या नवरदेवासोबत स्टेजवर बसली आहे. लग्न सुरू असतानाच नवरदेव थोड सरकून नवरीच्या बाजूला येतो. हे पाहून नवरी विचित्र हावभाव देते आणि आसपासचे लोकही तिचा चेहरा पाहत राहतात. लग्नाचा हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की नवरीचा मूड भरपूर खराब आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव असेच राहिले आहेत.

तिला नवरदेवाचं जवळ येणंही फारसं आवडलेलं दिसत नाही. व्हिडिओमध्ये नवरीचा मूड ऑफ असण्याचं कारण काहीही असो मात्र नेटकरी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत खिल्ली उडवत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.