जेव्हा प्रियंका चोप्रा बनली होती मिस वर्ल्ड, तेव्हा एवढा छोटा होता निक, पहा फोटो

बॉलीवूडमध्ये जर कोणत्या जोडीची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांची. या दोघांच्या वयातील फरकामुळे या कपलला अनेकदा ट्रोल केले जाते. त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होत असली तरी आजवर लोक त्यांना खूप ट्रोल करत आहेत. अशा परिस्थितीत आता निक जोनासचा एक फोटो व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड बनली तेव्हाचा हा निक जोनासचा फोटो असल्याचे बोलले जात आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

निक आठ वर्षांचा होता

प्रियांका चोप्राने तिच्या आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. तिने देशापासून ते परदेशापर्यंत सर्वत्र आपलं नाव मोठं केलं आहे आणि अगदी लहान वयातच नाव कमवायला सुरुवात केली. 2000 मध्ये जेव्हा तिने देशाला मिस वर्ल्डचा किताब दिला तेव्हा लोकांचा तिच्या बाबत अभिमान वाढला होता, पण तुम्हाला माहित आहे का निक जोनास त्यावेळी कसा दिसत होता. निक जोनास त्यावेळी फक्त आठ वर्षांचा होता.