कोण आहे ही अभिनेत्री जिच्या प्रेमात वेडा झाला रवी शास्त्री.. 20 वर्षे लहान असून पण..

तसं म्हणायला गेलं तर क्रिकेट आणि बॉलिवूडमधील नातं खूप जुनं आहे. बॉलिवूडने क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडुंचे नाव अभिनेत्र्यां सोबत जोडले गेले आहे. बॉलिवूड अभिनेत्रींशी या क्रिकेटपटूंचे संबंध असल्याचे समजले जायचे. नुकत्याच झालेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नामुळे पुष्टी झाली की बहुतेक अभिनेत्रींचे हृदय फक्त खेळाडूंनी जिंकले आहे.

विराट आणि अनुष्काच नव्हे तर त्या आधीही असे अनेक प्रकरण समोर आले आहेत. सागरिका आणि जाहीर यांच्या जोडप्याबद्दल ही आपण ऐकून आहोतच. अलीकडेच प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली की भारतीय फलंदाज रोहित शर्मा तिचा क्रश आहे.

जेव्हा जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा त्याची फलंदाजी नक्कीच पाहते. यापूर्वी प्रियांका चोप्राने खुलासा केला की तिला गौतम गंभीर खूप आवडतात आणि ती त्याची फलंदाजी कधीही चुकवत नाही. चाहत्यांच्या या यादीमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. पण यावेळी प्रकरण थोडे वेगळे आहे.

आतापर्यंत नायिकेचे हृदय खेळाडूंसाठी धडधडत होते, परंतु या प्रकरणात नायिकेचे हृदय कोणत्याही खेळाडूसाठी नसून टीम इंडियाच्या कोचवर आले आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांच्या प्रेमात पडली आहे.

एक बॉलिवूड अभिनेत्री टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांना डेट करत असल्याची माहिती मिळाली आहे. चला तर जाणून घेऊया ती अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण. भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांना आपले हृदय देणारी अभिनेत्री इतर कोणी नसून ती प्रसिद्ध अभिनेत्री निमरत कौर आहे.

होय, नुकत्याच रिलीज झालेल्या ‘एअरलिफ्ट’ चित्रपटामध्ये निमरत कौर अक्षय कुमारची पत्नी म्हणून दाखवली गेली आहे. ती बॉलिवूडमधील सर्वात हुशार अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘एयरलिफ्ट’ चित्रपटातील तिच्या कामाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘लंचबॉक्स’ चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली. पण यावेळी निम्रत पुन्हा एकदा मीडियाच्या चर्चेत आली आहे.

पण यावेळी ती तिच्या कोणत्याही चित्रपटासह आली नाहीय तर रवी शास्त्रीसोबत तिच्या नात्याबद्दल आली होती. बातमीनुसार, हे दोघे गेल्या 4 वर्षांपासून गुप्तपणे डेटिंग करत होते. २०१५ मध्ये कार लाँचिंग इव्हेंट दरम्यान दोघांची प्रथम भेट झाली. तेव्हा दोघांची भेट झाली आणि आता त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली आहे. तिचा कथित प्रियकर रवी शास्त्री निमरत कौर पेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे.

काही लोकांनी या नात्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तर काही लोक या बातमीमुळे आश्चर्यचकित झाले. रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये रितु सिंगसोबत लग्न केले आणि लग्नाच्या २२ वर्षानंतर त्यांचे घटस्फोट झाले. रवी आणि रितूला अलका नावाची एक मुलगी आहे. रवी शास्त्री यांनीही अभिनेत्री अमृता सिंग यांना निमरत कौरपूर्वी डेट केले आहे. 80 च्या दशकात त्याचे नाव चर्चेत होते. एका मासिकमध्येही अमृता आणि रवी यांचे फोटो प्रकाशित झाले होते आणि दोघांचे लवकरच लग्न होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात होता. पण १९९० मध्ये त्याने रितु सिंगशी लग्न केले.