बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात पाऊल ठेवल्यानंतर कलाकार एकतर सातव्या आस्मानात असतो.. किंवा मग थेट जमिनीवर आदळतो. परंतु एक गोष्ट नक्की की जमिनीवर आदळला तरी लोकांच्या नजरेत मात्र तो कलाकार कायम राहत असतो. आपले नशीब चमकावे या आशेने प्रत्येक कलाकार आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असतो.. परंतु प्रत्येकाचं नशिब चमकतेच असे नाही. अनेकांच्या पदरात निराशा देखील पडते.
आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या बॉलिवूड करिअर ची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु नंतर ती आपली लोकप्रियता टिकवू नाही शकली. त्यामुळे त्यांना इंडस्ट्री तर सोडावी लागली पण त्या आधी त्यांनी शक्कल लढवून अब्जाधीशासोबत लग्न केलं.. आणि आता करोडोंच्या मालकीण आहेत. तर चला जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी लव्हर बॉय इमेजमधून चित्रपट रसिकांना वेड लावलं. रुपेरी पडद्यावर प्रेम तसंच विरहगाथा त्यांनी कधी हसवत तर कधी डोळ्यात आसवं आणत निभावल्या आणि इतिहास रचला. त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींशी राजेश खन्ना यांची सिनेमात जोडी जमली.
त्याकाळी रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये राजेश खन्ना यांचं नाव अनेक अभिनेत्रींशीही जोडलं गेलं. पण असे म्हटले जाते की, डिम्पल कपाडियासोबत लग्न केल्यानंतर राजेश खन्ना टीना मुनिमबरोबर रिलेशनशिपमध्ये आले होते. राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांचं प्रकरण भरपूर गाजलं.
सौतन सिनेमाच्यावेळी राजेश खन्ना आणि टीना मुनिम यांच्यात जवळीक वाढू लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. टीनावर राजेश मनापासून प्रेम करायचे. ते एकत्र राहू लागले. राजेश खन्ना यांनीदेखील हे नाते कधीच लपवले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाले की, मी टीनावर एवढे प्रेम करतो की मी तिचा दात घासण्यासाठी टुथब्रश पण वापरतो. यानंतर त्यांच्या या मुलाखतीची खूप चर्चा देखील झाली होती. दोघांची जोडी चित्रपटा मध्ये देखील कमाल दाखवू लागली होतो.
टिनाची इच्छा होती की डिम्पलला घटस्फोट देऊन त्यांनी तिच्याशी लग्न करावे. पण इच्छा असूनही राजेश खन्ना हे करू शकले नाही. ते एका प्रकारे डिम्पलशीही जोडले गेले होते राजेश जेवढे प्रेम टिनावर करायचे त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम ते डिंपलवर करायचे. टीनाला वाटले की राजेश तिला फसवत आहेत. बरीच वाट पाहिल्यानंतर टीनाने त्यांच्याबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
टीनाच्या निर्णयाने राजेश खन्ना पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्यांनी तिने सोडून जाऊ नये म्हणून अनेकवेळा टीनासमोर विनावण्या केल्या. पण टीनाने निर्णय घेतला होता. जाताना टीनाने राजेश यांना गिफ्टही दिले. तिने त्यांच्या २० चित्रपटांची कॉपी बनवून त्यांना गिफ्ट दिले. नंतर संजय दत्त टीनाच्या आयुष्यात आला. पण टीनाने त्याला त्याच्या ड्र’ग्स व्य’सनामुळे त्याला सोडून दिले.
परंतु अखेर अनिल यांच्या साधेपणा वर टीना भाळली. इतक्या मोठ्या कुटुंबातून असून देखील अनिल अगदी साधे राहायचे. दोघे प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे अजूनही सुखी वैवाहिक आयुष्य जगतायत. आणि लग्नानंतर टीनाने देखील बॉलिवूड ला राम राम केलं.
