नोरा फतेहीची ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहत्यांना फुटला घाम, कट ड्रेसने वाढवली ‘गर्मी’

डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने चाहत्यांची मने जिंकली. चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल खूप आवडते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज नोरा टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये ऑफ-व्हाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये नोराने पांढरा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे आणि त्यासोबत पांढऱ्या रंगाची हँडबॅगही घेतली आहे. यासोबत तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत त्यामुळे तिचा लूक परफेक्ट दिसत आहेत. नोराचा हा अवतार तिच्या चाहत्यांना फार आवडला आहे. तिचे चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट करत आहे. काही चाहते सांगत आहेत की, नोराने तिच्या लूकमुळे मुंबईचा पारा उंचावला आहे.

टी-सीरीजच्या ऑफिसबाहेर फोटोग्राफरसाठी नोराने वेगवेगळी पोझेस दिल्या. जे तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे.नोरा लवकरच अजय देवगनच्या ‘भुज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नोरा काही काळापूर्वी डान्स दिवाना 3 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. काही भागांत ती जज म्हणून दिसली होती.
नोरा फतेहीचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट्सचा पाऊस पडतोय.नोराने तिच्या लेटेस्ट काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये नोराची किलर पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.