बूटांना पॉलिश करून पोट भरणारा ‘हा’ लोकप्रिय गायक आज कमावतोय करोडो

आपली आर्थिक, सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी त्यावर मात करून आयुष्यात पुढे जाणाऱ्यांची आणि आपली स्वप्नं पुर्ण करणाऱ्यांची यशस्वी गोष्ट ऐकून आपल्यालाही प्रेरणा मिळते. शारिरीक व्यंगावर मात करूनही अनेकजणं यशस्वी होतात. (indian idol winner sunny hindustani success story from a shoe polisher to super singer)

अशीच एक स्ट्रगल स्टोरी असणाऱ्या गायकानं आपली ही स्ट्रगल स्टोरी सक्सेस स्टोरीमध्ये रूपांतरित केली आहे. हा गायक छोट्या गावात आला असून त्यानं मोठ्या रिएलिटी शोचं दारं ठोठावलं आणि चक्क आज तो लक्झरियस लाईफ जगतो आहे आणि त्याची एक परदेशी गर्लफ्रेंड पण आहे. 

हा गायक आहे सनी हिंदूस्थानी (Indian Ido Winner Sunny Hindostani). सनी हिंदूस्थानी तीन वर्षांपुर्वी इंडियन आयडॉल 11 (Indian Idol 11) मधून प्रेक्षकांसमोर आला होता. संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) यांनी त्याच्या टेलेंटला वाव दिला आणि या शोमधून म्हणता म्हणता तो या शोचा विजेताही झाला. 

सनी हा भठिंडा येथील अमरापुरा या गावातला आहे. लहाणपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यामुळे रोजीरोटी भरण्यासाठी सनीला नाईलाजानं फुगे विकून पैसे कमवयाचा तसेच कधी त्याला बूट विकूनही पैसे कमवायची वेळही आली होती. परंतु इंडियन आयडॉलच्या यशामुळे आज सनी सर्वात लक्झरीयस आयुष्य जगतो आहे.