आर्चीचा परश्या अभिनय सोडून करू लागला शेती? फोटो पाहून सगळेच हैराण

‘सैराट’मुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेला आर्चीचा परश्या सध्या काय करतोय तर शेतीत राबतोय. होय, परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसरचे नवे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल. सध्या त्याचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनय सोडून परश्याने शेतीकडे वळला की काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.आकाश नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतो. त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. विविध फोटो व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या आकाशने असेच काही फोटो शेअर केलेत आणि चाहते हैराण झालेत.

या फोटोत परश्या बैलाला आंघोळ घालतोय, चारा वेचतोय. हे फोटो पाहून आकाश अभिनय सोडून शेतीकडे वळला की काय अशी शंका अनेकांना आली. पण असे काहीही नाही. हे फोटो आकाशच्या वेबसीरिजमधील आहेत. आकाश लवकरच ‘1962 – द वॉर इन द हिल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

या वेबसीरिजच्या सेटवरचे हे फोटो आहेत. आकाश या वेबसीरिजमध्ये किशन नावाच्या आर्मी आॅफिसरची भूमिका साकारत आहे. ‘सैराट’ हा आकाशचा हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाने तरुणाईला अगदी वेड लावले. या चित्रपटामधील आर्ची-परशाची जोडी तर आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

या चित्रपटापासूनच आकाशने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आता आकाशचा पूर्णच कायापालट झाला आहे. याआधीही आकाशने नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता तो नव्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे.

या वेबसीरिज व्यतिरिक्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातही आकाश दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची आकाशला संधी मिळाली आहे.