बॉलिवूड चित्रपट निर्माते महेश भट्ट त्यांच्या प्रेम कहाणीमध्ये अनेकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी ते आपल्या मुलीशी लग्न केले असते अश्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही ते वादाच्या भोवऱ्यायात सापडले आहे. महेश यांनी दिलेल्या या वक्तव्यामुळे त्यांना बर्याच वादाचा सामना करावा लागला. वास्तविक हा वाद मुलीला लीप किस करण्यावरून चालू झाला होता. हे प्रकरण बरेच वाढले होते.
बॉलिवूड अभिनेत्री परवीन बॉवी सोबत देखील महेश भट्ट यांचे नाव जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार महेश भट्ट विवाहित असताना परवीन बॉवीच्या प्रेमात पडला होता. ८० आणि ९० च्या दशकात परवीन बॉवी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. चला तर मग महेश भट्ट आणि परवीन बॉवी च्या अफेअरबद्दल जाणून घेऊया.
बातमीनुसार, परवीन बॉवी आधी बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीला डेट करत होती. पण जेव्हा कबीर बेदीबरोबर तिचा ब्रेकअप झाला तेव्हा तिला खूप वाईट वाटले. यामधून ती सावरत होती की तिच्या आयुष्यात महेश भट्टची एन्ट्री झाली होती. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली, दोघेही लीव्ह इनमध्ये राहू लागले. असे म्हणतात की परवीन एक सामान्य मुलगी होती तिला फक्त प्रेम कसे करावे हे माहित होते.
तिला महेश भट्टवर वेड्यासारखे प्रेम झाले होते. एका रात्री, जेव्हा महेश भट्ट रागावला होता आणि निघून गेला होता तेव्हा परवीन त्याच्या मागे मागे पळत होती. बातमीनुसार यावेळी तिने तिच्या कापड्याकडे देखील लक्ष नाही दिले घातले आहेत की नाही. एका मुलाखती दरम्यान महेशने सांगितले होते की परवीनने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती, त्यामुळे त्याला राग आला होता.
महेशने सांगितले होते की परवीनला माझ्यासोबत नातं जोडायच होत. जेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ आलो, तेव्हा परवीन मला म्हणाली एकतर मी किंवा यूजी! हे ऐकून मला आश्चर्य वाटले व मी शांतपणे कपडे घालून खोलीतून बाहेर पडलो. वास्तविक, परवीन यांनी ज्या यूजीचा उल्लेख केला तो महेशचा स्वतंत्ररित्या काम करणारा आणि मार्गदर्शक यूजी कृष्णमूर्ती होता.
महेश पुढे म्हणतो की जेव्हा मी खोलीबाहेर पडलो तेव्हा परवीनने मला आवाज दिला. पण त्याकडे मी दुर्लक्ष करून मी पुढे गेलो. मी लिफ्टची प्रतीक्षा केली नाही, पायर्या उतरून जाऊ लागलो. मी पायर्यावरून खाली येत असताना मला पळण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून मला मागे वळून तिला सांगायचे होते की कपड्यांशिवाय बाहेर येऊ नको.
पण मी तसे केले नाही आणि पुढे गेलो. बातमीनुसार महेश भट्ट आणि परवीन बॉवी यांच्यातील हा ब्रेकअप होता. तर, अन्य काही माध्यमांच्या वृत्तानुसार, महेश भट्टसोबतच्या नात्यादरम्यान परवीन बॉवीला गंभीर आजार झाला होता. महेश भट्ट आपली पत्नी सोडून परवीन बॉवीसोबत स्वतंत्र घरात राहू लागला.
एका रात्री महेश भट्ट घरी परत आले तेव्हा त्याने पाहिले की परवीन बॉवी हातात चाकू घेऊन खोलीच्या कोपऱ्यात बसली होती. महेश भट्ट तिथे पोहोचले तेव्हा पनवीन बॉवीला या अवस्थेत पाहून तो स्तब्ध झाला. अशा परिस्थितीत प्रथमच परवीनला पाहून महेश घाबरला होता.
जेव्हा त्याने परवीनला डॉक्टरांकडे दाखवले तेव्हा त्यांना गंभीर आजार असल्याचे निदर्शनास आले. हळूहळू परवीन बॉवीची अशी अवस्था झाली की ती एका खोलीत कैद राहत असत. असं म्हणतात की तिची प्रकृती अशी बनली होती की तिला नीट चालता येत नव्हते.
