करोडपती सोबत लग्नानंतर बॉलिवूड सोडून गेली होती ही अभिनेत्री.. पती लॉसमध्ये जाताच आता करू लागली हे काम..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला स्वप्न नगरी असे देखील म्हटले जाते. अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार..

गेल्या काही दशकात अनेक कलाकारांनी आपल्या भुमिकांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आणि या भूमिका अजरामर झाल्या. आजही अनेक आशा भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. परंतु काही असे कलाकार देखिला आहेत ज्यांची करिअरची सुरवात तर अतिशय भन्नाट झाली पण नंतर काळाच्या ओघात त्यांचा विसर पडला.

आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाली. परंतु नंतर मात्र ती आपली जादू कायम ठेवण्यात असमर्थ ठरली आणि लोकांच्या विस्मरणात गेली. आणि आता मात्र ती पुन्हा बॉलीवूड मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.

अजय देवगणने हिंदी चित्रपटात ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले हे सगळ्यांनाच माहीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्रीची भूमिका ‘मधू’ या नवख्या अभिनेत्रीने निभावली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्याने त्या काळात सुमारे 12 कोटींची कमाई केली होती. त्याच बरोबर मधू आणि अजय देवगण ही जोडी देखील रातोरात स्टार झाली.

मधुचा हा पाहिलाच चित्रपट होता. तिने या चित्रपटामधूनच बॉलिवूड मध्ये प्रवेश केला आहे.बॉलिवूड व्यतिरिक्त तिने अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तमिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. मधुने तमिळ आणि मल्याळम मध्ये सुमारे ५० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बॉलिवूड मध्ये तिने थोडेफारच चित्रपट केले आहेत.

मधूचे पूर्ण नाव मधुबाला रघुनाथ आहे. मधु हे हेमा मालिनीची भाची आणि जुही चावलाची मेव्हणी आहे. मधुने बॉलिवूड व्यतिरिक्त मल्याळम, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मधुचा जन्म 26 मार्च 1969 रोजी झाला होता. मधु सध्या 50 वर्षाहून अधिक वयाची आहे.

‘फुले और काटे’ शिवाय मधु मणिरत्नमच्या ‘रोजा’ या चित्रपटासाठीही ओळखली जाते. ज्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण मधूला प्रसिद्धी मात्र फुल और कांटे मधूनच मिळाली. मधुने भरतनाट्यममध्ये प्रशिक्षण दिले आहे जे तिच्या आईने तिला शिकवले. मधुने 19 फेब्रुवारी 1999 रोजी उद्योगपती आनंद शाहशी लग्न केले.

लग्नानंतर मधुने चित्रपट कारकीर्दीतून ब्रेक घेतला. परंतु वृत्तानुसार लग्नानंतर काही वर्षांतच मधुच्या पतीचा व्यवसाय बुडाला आणि त्याने घरासह संपूर्ण मालमत्ता विकली आणि कर्ज फेडले. या सर्व घटनांमुळे पैशाच्या अभावी मधूने पुन्हा एकदा बॉलिवूड मध्ये एन्ट्री घ्यायचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत मधुचा लूक खूप बदलला आहे. 50 असूनही ती पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस बनली आहे. मधु सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि आपले जुने आणि नवीन फोटो शेअर करत राहते. मधु या ‘थालाईव्ही’ नावाच्या जयललिता यांच्या बायोपिक मधून पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे.