मुलांच्या भीतीने ही प्रसिद्ध अभिनेत्री बाथरूममध्ये करायची असे काही, ते जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

प्रियांका चोप्राने मागे ३८ वा वाढदिवस साजरा केला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथे प्रियांका लहानाची मोठी झाली. जमशेदपूरमध्ये प्रियांकाचा जन्म झाला. पण आई- वडील भारतीय सेनेत असल्यामुळे तिला लखनऊ, बरेली, दिल्लीसह अनेर राज्यांमध्ये राहण्याची संधी मिळाली. २००० मध्ये ती मिस वर्ल्ड झाली. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही तिने अथक मेहनतीने आपल्या नावाचा ठसा कायम राखला आहे. प्रियांकाने आंतरराष्ट्रीय गायक निक जोनसशी लग्न केलं. प्रियांका आज ज्या स्थानी आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला तुफान मेहनत करावी लागली. ती जेव्हा अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती तेव्हा तिला रंगावरूनही चिडवलं जायचं.

एवढंच नाही तर तिच्या पायावर पांढरे डाग होते, यावरूनही तिची खिल्ली उडवली जायची. आज प्रियांका १० हून जास्त ब्रॅण्डची अॅम्बेसिडर आहे. प्रियांका चोप्रा भलेही आज एक स्टाइल आयकॉन असेल पण लहानपणी तिला पाश्चिमात्य कपडे घालू दिले जायचे नाही.

प्रियांका म्हणाली होती की, जेव्हा ती अमेरिकेवरून भारतात आली आणि वयाने मोठी होत होती तेव्हा तिने घट्ट कपडे घालू नये असंच बाबांना वाटत होतं. प्रियांका अभ्यासातही तेवढीच हुशार होती. तिला लहानपणी मिठ्ठू नावाने सर्व हाक मारायचे. पण तिला हे नाव आवडायचं नाही म्हणून तिने स्वतःचं नाव बदलून मिमी केलं.

वयाच्या १३ व्या वर्षी प्रियांका अमेरिकेतील शाळेत शिकत होती. तिथे तिला वंशभेदाचा सामना करावा लागला होता. तिथली मुलं तिला ‘ब्राउनी’ आणि ‘करी’ म्हणून हाक मारायचे. मध्यम वर्गीय कुटुंबातून आल्यामुळे प्रियांका फारशी तिथे रमली नाही. प्रियांकाने हेही सांगितलं की ती सतत घाबरलेली असायची. तिचा रंग सावळा होता आणि तिच्या पायावरही पांढरे डाग होते.

मुलांच्या चिडवण्यामुळे तिचा आत्मविश्वासही कमकूवत झाला होता. एवढंच नाही तर घाबरून ती शाळेतला डबा वॉशरूममध्येच खायची. अमेरिकेत वंशभेदाची शिकार झालेल्या प्रियांकाला तिच्या मेहनतीवर अतोनात विश्वास होता. एकवेळ अशी होती की ज्या पायांवरील डागांची तिला लाज वाटायची आज तेच पाय १२ ब्रॅण्डस विकत आहेत.

प्रियांकाने सांगितले की, एका मुलीने तिला अतोनात त्रास दिला होता. त्या मुलीच्या प्रियकराला प्रियांका आवडत होती. त्यामुळेच ती मुलगी प्रियांकाला फार त्रास द्यायची. प्रियांकाला लहानपणापासून लग्नाचं वेड होतं. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती स्वतः अनेकदा नवरीप्रमाणे नटायची. वयाच्या १२ व्या वर्षीपासून तिला लग्न करण्याची इच्छा होती.

प्रियांकाने अगदी राजेशाही थाटात निक जोनसशी लग्न केलं. त्या दोघांचं लग्न अनेक महिने चर्चेचा विषय होतं. प्रियांकाने जोधपुरच्या उमेद भवनमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. लहानपणीचं लग्नाचं स्वप्न तिने खऱ्या अर्थाने पूर्ण केलं. जेव्हाही दोघं एकत्र असतात त्यांच्या नावाची चर्चा होतेच.