‘मेरे सय्या सुपरस्टार’ गाण्यावर मंडपात नाचलेली नवरी आठवतेय का.. पुन्हा घेऊन आलीये नवा व्हिडीओ.. रातोरात झाला व्हायरल..

सोशल मीडिया एक असं माध्यम आहे. ज्यावरून लोक क्षणार्धात लोकप्रियता मिळवू शकतात. आजपर्यंत आपण अशी कित्येक उदाहरण पहिली आहेत. अलीकडे लोक आपल्या खाजगी आयुष्यातील प्रत्येक क्षण खास बनविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात.

नोव्हेंबर मध्ये एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड पसंत करण्यात आला होता. ती मुलगी म्हणजे श्वेता ताजने. नवरी मुलीने फक्त खाली मान घालून मंडपात बसावे या वृत्तीच्या लोकांना तिने चांगलीच चपराक लावली होती. आपल्या आयुष्यातील या सर्वात महत्वाच्या दिवसाला आपण कस खास बनवू शकतो, हे तिनं दाखवलं होतं.

अलीकडेचं एक मराठमोळी (Maharashtrian Bride) नवरी खुपचं चर्चेत आली होती. आणि कारणही तसंच खास होतं. स्वतःच्याच लग्नात या मुलगीने धमाकेदार डान्स करत एन्ट्री घेतली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral On Social Media) झाला होता.

या मुलीने ‘मेरे संय्या सुपरस्टार’ या गाण्यावर गाण्यावर अक्षरशः धम्माल केली होतं. तिची ही एन्ट्री आजही लोकांच्या लक्षात राहिली आहे. या मुलीचं नाव श्वेता ताजने(Shweta Tajane)  असं आहे. नुकताच श्वेताचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सुद्धा ती आपलं कौशल्य दाखवताना दिसत आहे.

खर तर मुलीने आपल्याच लग्नात नाचलेल पाहण्याची अनेक लोकांची मानसिकता नसते. पण म्हणतात ना हौसेला मोल नसत. आणि श्वेताने स्वतः नवरी असून डान्स करण्याच धाडस दाखवल आणि अनेकांनी तीच कौतुक देखील केल. ‘मेरे सैय्या सुपरस्टार’ या गाण्यावर श्वेताने केलेला डान्स व्हिडिओला काही दिवसातच लाखो लोकांनी पहिला होता.

आता श्वेता परत एकदा सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असून तिचा आणखी एक डान्स आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र ‘पुण्याची मैना’ या गाण्याचा ट्रेंड चालू असून श्वेताने याच गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. तिचा हा डान्स लाखो लोकांना पसंद आला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की श्वेता एक उत्तम डान्सर आहे, आणि तिला आवडही आहे.

मुळची जुन्नर येथील असणाऱ्या श्वेताच शिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. श्वेताचा नवरा संकेत इंजिनिअर असून एका कंपनीत जोबला आहे. श्वेताच्या लग्नातल्या डान्समुळे अनेक लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला काही फरक पडला नाही कारण माझी सासू आणि पती मला सपोर्ट करतात असे तिने सांगितले. संकेत व श्वेता यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

.