राधिका आपटेचा ‘तो’ न्यू-ड फोटो पुन्हा व्हायरल, सोशल मीडियावर #BoycottRadhikaApte ट्रेंड

अभिनेत्री राधिका आपटे तिच्या दमदार आणि हटके अभिनय शैलीसाठी ओळखली जाते. आजवर राधिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली. सिनेमांसोबतच राधिका तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी देखील ओळखली जाते.

बोल्ड अंदाजामुळे अनेकदा राधिकाला ट्रोल व्हावं लागलं आहे. राधिका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळतो. नेटकऱ्यांनी राधिका आपटेच्या सिनेमांमवर बहिष्कार घालण्याची मागणी केली.

राधिकाच्या कोणत्याही नव्या सिनेमामुळे किंवा फोटोमुळे नव्हे तर एका जुन्या सिनेमातील सीनमुळे राधिकावर नेटकरी संतापले आहेत. राधिका आपटेच्या २०१६ सालामध्ये आलेल्या ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यू-ड सीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात राधिका आपटे आणि अभिनेता आदिल हुसैन यांच्यात एक न्यूड सीन होता.

या सीनची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. या सीनमधील त्या न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा नेटकरी राधिकाला ट्रोल करत आहेत. भारतीय संस्कती जपा असं म्हणत नेटकऱ्यांनी राधिकासह बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ‘बॉलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत आहे’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान राधिकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी राज कुंद्रा प्रकरणाशी संबध जोडला आहे. एक युजर म्हणाला, “कठुआ प्रकरणात हिंदूना बदनाम करण्यात बॉलिवूडचा मोठा हात आहे. फरहान, तापसी, स्वरा वगैरे म्हणाले यांनी सीएए मुसलमानांच्या विरोधात असल्याचं म्हंटलं होतं. पण राज कुंद्राच्या प्रकरणावर सर्वांनी मात्र तोंड बंद ठेवलं आहे.” असं युजर म्हणाला.

तर राधिकाच्या न्यू-ड फोटोवर एक नेटकरी म्हणाला, “त्यांनी अश्लीलता पसरवली आहे. देशाच्या हितासाठी त्यांवर बहिष्कार घातला पाहिजे.” दरम्यान, ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यू-ड सीन बद्दल राधिका म्हणाली होती, “हे अजिबात सोपं नव्हतं कारण त्यावेळी मी माझ्या बॉडी इमेजला घेऊन चिंतेत होती. अशा परिस्थितीत न्यू-ड सीन देणे अत्यंत भयानक होते. आता मला माझ्या बॉडी शेप आणि साइजचा अभिमान आहे आणि मी आता कुठेही न्यू-ड सीन देऊ शकते,” असे राधिका म्हणाली होती.