इतक्या सुंदर चेहऱ्याची लावली वाट…! प्लास्टिक सर्जरीनंतर आता ओळखुही येईना आता रकुल प्रीत..

साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री रकुल प्रीतचा  (Rakul Preet Singh) आत्ताचा  लुक पाहाल तर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. होय, रकुलने तिचा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तो पाहून चाहते शॉक्ड आहेत. ही रकुलचं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  

रकुलने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:चा हा फोटो शेअर केला. तिचे नाक आणि  गाल पाहून चाहत्यांना धक्काच बसला. तिचा हा अवतार पाहून रकुलने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा आहे. रकुलने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा सवाल अनेकजण विचारत आहेत.

रकुलचा हा नवा लुक क्षणात व्हायरल झाला. काहींना तो आवडला. पण काहींनी तिचा हा नवा अवतार पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ही कोण आहे? असा सवाल एका युजरने केला.

हिनेही प्लास्टिक सर्जरी केली का बॉलिवूड च्या कलाकारांना नेमकं झालं तरी काय? इतक्या सुंदर चेहऱ्याची वाट लावली,अशी प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली. आम्हाला आधीचीच रकुल हवी, अशी कमेंट एका युजरने केली. रकुलने खरोखर प्लास्टिक सर्जरी केली की ही मेकअपची करामत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

काही महिन्यांपूर्वी रकुल प्रीत ड्र-ग्स प्रकरणामुळे चर्चेत आली होती. एलएसडी आणि एमडीएमए सारख्या महागड्या अं-मली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या  एका टोळीच्या चौकशीदरम्यान तेलुगू फिल्म इंडस्ट्रीच्या 10 सेलिब्रिटींना एनसीबीने समन्स बजावले होते. यात रकुल प्रीतच्या नावाचा देखील समावेश होता.

2009 साली ‘गिल्ली’ य कन्नड चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. यानंतर 2011 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुन्हा कमबॅक केले. अगदी फार कमी वेळात रकुल साऊथची बडी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली. पाठोपाठ बॉलिवूडमध्येही तिचा डेब्यू झाला. अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात रकुल भाव खाऊन गेली.