पोज देतानाच ड्रेसनं केली रकुल प्रीत सिंगची फजिती, Oops Moment कॅमेऱ्यात कैद

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती लवकरच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत एका चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चित्रपटाबाबत ती उत्सुक असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते.

या चित्रपटाचे नाव ‘MayDay’ असल्याचे म्हटले जाते. दरम्यान रकुलचा एक समर लूक चर्चेत आहे.रकुलने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती Oops Momentची शिकार झाली आहे. रकुलने फिकट पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि त्यावर डेनिमचे जॅकेट परिधान केले आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते.

तिने यावर एक छोटी बॅग घेतली होती. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. ती फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देत होती. दरम्यान तेथे वारा आला अन् रकुलचा ड्रेस उडू लागतो. पण रकुलने हाताने ड्रेस पकडला. पण सोशल मीडियावर रकुल Oops Momentची शिकार झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

रकुलने या ड्रेसवर घेतलेल्या बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही बॅग Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या बॅगची किंमत ८०, ९५६ रुपये आहे. रकुल ‘MayDay’ या चित्रपटाशिवाय ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात देखील काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.