‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादाने सुरू केला स्वतःचा व्यवसाय

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये राणाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु करून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली.

त्याने कोल्हापूरमध्येच नवीन व्यवसाय सुरु केला आहे.हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ‘नमस्कार, आजपर्यंत कोल्हापूरकरांनी आणि समस्त मराठी प्रेक्षकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. अगदी लहान मुलांपासून ते आजी- आजोबांपर्यत सगळ्यांनीच माझे खूप लाड केले.

म्हणूनच या सगळ्यांसाठी मी पौष्टिक असे पदार्थ आणलेत. जे माझ्या स्वतःच्या ब्रँडचे आहेत. यात कोल्हापूरची बदाम थंडाई आणि इतरही अनेक पदार्थ आहेत. तुम्ही या आणि या पदार्थांचा आस्वाद घ्या. तुमचे फोटो किंवा व्हिडीओ कोल्हापूर बदाम थंडाई या फेसबुक पेजवर टॅग करा.

त्यातून काही भाग्यवान विजेत्यांना खास भेटवस्तू देखील मिळणार आहे.’ असं म्हणत त्याने त्याच्या दुकानाचा पत्ता देखील सांगितला आहे.हार्दिकने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत साकारलेल्या राणाच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.

रांगडा पण हळुवार मनाचा राणादा प्रेक्षकांना भावाला होता. पैलवान असूनही स्त्रियांपासून दूर पळणारा राणा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता होता. त्यासोबतचं पाठकबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर हिनेदेखील प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती.