‘या’ कारणामुळे राणी मुखर्जीने मीडियापासून दूर ठेवले तिची मुलगी आदिराला, पहा तिचे लेटेस्ट फोटो

करिना कपूर – सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान, शाहरुख खानचा मुलगा अबराम, शाहिद कपूरची मुलगी मीशा असो हि सगळे स्टार किड्स नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. मात्र या सगळ्यात अभिनेत्री राणी मुखर्जी नेहमीच आपल्या मुलीला या लाईंम लाईटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.

आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची मुलगी आदिरा चोप्रा काही दिवसांपूर्वीच दोन वर्षांची झाली आहे. मात्र बर्थ डे पार्टी दरम्यानचा आदिराचा एक ही फोटो सोशल मीडियावर आला नाही. यावर राणी मुखर्जीने सांगितले की मी आणि माझा नवरा आदित्य चोप्राने हा निर्णय घेतला आहे की मुलगी आदिराला लाईम लाईटपासून दूर ठेवून सामान्य मुलीप्रमाणे तिला वाढवायचे.

राणीने आगामी चित्रपट हिचकीच्या ट्रेलर दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आदिरा बाबतचा निर्णय मी आणि आदित्य चोप्राने एकत्र पणे घेतला आहे. मला असे वाटते कि माझा नवरा हा शांतता प्रिय स्वभावचा आहे. त्यामुळे त्याला वाटते आदिराने सामान्य आयुष्य जगावे.

राणी आणि आदित्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर एप्रिल 2014 ला दोघांनी इटली मधून जाऊन लग्न केले. मर्दानी चित्रपटानंतर राणी आदिरामध्ये व्यस्त झाली. तब्बल चार वर्षांनंतर ती चित्रपटात कमबॅक करते आहे. या चित्रपटात राणीने टॉरेट सिंड्रोमने पीडित असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे.

यात व्यक्तिला सतत उचकी लागते. या ‘हिचकी’मुळे ती अनेकदा आपले म्हणणे पूर्ण करू शकत नाही. तिला टीचर बनायचे असते. यासाठी ती अनेक मुलाखती देते. पण तिचा वाणी दोष तिच्या या स्वप्नाच्या आड येतो. पण म्हणतात ना, प्रयत्नांनी परमेश्वर. एक शाळा तिला नोकरी देते. या शाळेत काही खोडकर मुलांसोबत तिची गाठ पडते.

ही मुले राणीला त्रासवून सोडतात. तिच्या ‘हिचकी’वरून तिना नाही नाही ते बोलतात. राणीने यात नैना माथूर नामक महिलेचे पात्र साकारले आहे.