“लग्नानंतर मी निकसाठी अनेक रात्री जागून…”, प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्रियांका आणि निक अनेकदा त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. मात्र लग्न झाल्यानंतर प्रियांकाने निकसाठी अनेक रात्र जागून काढल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत खुलासा केला होता.

प्रियांका आणि निक हे दोघे अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असता. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे एकमेकांवरील प्रेम दिसून येते. विशेष अनेक कार्यक्रमातही ते दोघेही एकत्र हजेरी लावतात. प्रियांका आणि निकने प्रेमविवाह केला असून त्यांच्यातील प्रेम कसूभरही कमी झालेले नाही.

पण निकसोबत लग्न झाल्यानंतर प्रियांकाने त्याच्यासाठी अनेक रात्र जागून काढल्या आहेत. लग्नानंतर प्रियांकाला अनेक तास जागी राहायची, एका मुलाखतीत प्रियांकाने याचा खुलासा केला होता.प्रियांकाने या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, “लग्नानंतर मला अनेक तास झोपच यायची नाही.

कारण निक जोनसला मधुमेहाचा त्रास आहे. त्याला मधुमेहाचा हा त्रास फार वर्षांपासून आहे. त्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणामुळे निक अनेकदा त्याची शुगर चेक करण्यासाठी रात्री उठतो.”

“निक फार संवेदनशील आहे. त्याची शुगर ठिक आहे का? ती वाढली की कमी झाली? हे पाहण्यासाठी निकला रात्री वारंवार उठावे लागते. दरम्यान लग्नानंतर मी निकची शुगर चेक करायचे. त्यामुळे मला अनेक रात्री जागून काढाव्या लागल्या,” असे प्रियांका म्हणाली.प्रियांका तिची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.

दरम्यान निकनेही एकदा मुलाखतीत तिेचे फार कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या. पण मला प्रियांकासारखी मुलगी मिळणे खूप अवघड आहे, असे त्याने एकदा मुलाखतीत म्हटले होते.