जेव्हा रेखा साठी अमिताभ यांनी केली होती एका व्यक्तीला मा-रहा-ण.. या घटनेनंतरच रेखा ने दिले होते अमिताभला-

बॉलिवूडच्या काही प्रेमकथांची चर्चा आजही रंगते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी त्यापैकीच एक. खरे तर रेखा यांचे नाव अनेकांशी जोडले गेले. पण अमिताभ व रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होते. म्हणूनच आजही कुठल्या समारंभात रेखाची एन्ट्री झाली की, पाठोपाठ मीडियाचे कॅमेरे अमिताभ यांचे हावभाव टिपण्यासाठी वळतात.

असे म्हणतात की, रेखा अमिताभवर जीवापाड प्रेम करायच्या. ‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमाचे शूटींग सुरू असताना अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची कुणकुण मीडियाला लागली आणि या लव्हस्टोरीबद्दलच्या अनेक बातम्या रंगू लागल्या.

तुम्हाला माहीत आहे का, रेखा यांच्यावर अश्लील कमेंट केल्यामुळे अमिताभ यांनी एका व्यक्तीला काही वर्षांपूर्वी चांगलाच चोप दिला होता. या गोष्टीची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती. 

यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना 1977 मध्ये घडली होती. ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाचं शुटींग राजस्थानमधील जयपूरमध्ये सुरू होते.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांना पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. आणि अशातच एका व्यक्तीने रेखा यांच्यावर अश्लील कमेंट केली. त्याला अनेकवेळा समजावून सांगण्यात आलं. पण तरीदेखील तो शांत बसतच नव्हता. अमिताभ यांना या गोष्टीचा प्रचंड राग आला होता.

अखेरीस त्याला अमिताभ यांनी बेदम चोप दिला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना या प्रकरणात मध्यस्ती करावी लागली होती. या घटनेनंतर त्या दोघांच्या अफेयरच्या चर्चांनी अजूनचं जास्त जोर धरला होता. असं म्हटलं जातं की या घटनेनंतरच रेखा यांनी अमिताभ यांना आपलं हृदय दिलं.

ही गोष्ट आहे 1981 मध्ये रिलीज झालेल्या ‘लावारिस’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानची. ‘लावारिस’ चित्रपटातील ‘आपका क्या होगा जनाब ए अली’ या गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासह इराणी मूळच्या नृत्यांगना ‘नेली’ यांनी नृत्य केले होते. हे गाणे तुफान सुपरहिट झाले. आणि हा चित्रपट देखील भरपूर गाजली. सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा होऊ लागली.

या गाण्याची लोकप्रियता पाहून मीडियाने अफवा पसरविली की अमिताभ बच्चन आणि डान्सर नेली यांच्यात अफेयर सुरू आहे. या विषयावर रेखाने अमिताभ बच्चन यांच्याशी भांडण सुरू केले. इतकेच नाही तर ती सेटवर पोहोचली आणि अमिताभ बच्चन यांना सगळ्यांसमोर चांगलेच सुनावले.

अमिताभ बच्चन यांनी रेखाला बराच वेळ समजावले पण रेखा अमिताभचे काहीही ऐकायला तयार नव्हती. वारंवार समजावूनही न ऐकल्यामुळे अमिताभ यांचा स्वतः वरील ताबा सुटला आणि त्यांनी रेखाला एकामागोमग एक अशा कानशिलात लगावला .

यावर रेखाला खूप राग आला आणि ती चित्रपटाचा सेट सोडून निघून गेली. तिने अमिताभ सोबत शूटिंग चालू असलेला ‘सिलसिला’ हा चित्रपट सोडला होता. नंतर अमिताभने रेखाच्या घरी जाऊन रेखाची खूप समजूत काढली.या घटनेनंतर दिग्दर्शक यश चोप्राने देखील रेखाला खूप समजावलं. यश चोप्राने रेखा आणि जया बच्चन दोघांनाही या चित्रपटासाठी तयार केलं

.