आपणा सर्वांना ठाऊकच आहे की बॉलिवूडमध्ये बरीच ह्रदये जोडली गेली आहेत आणि तितकीच तुटलेली देखील आहेत. काही जोडप्यांचे अफेअर इतके गाजले होते की ते मीडियामध्ये बराच काळ चर्चेचा विषय ठरले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याविषयी सांगणार आहोत, ज्यांच्या प्रेम प्रकरणाविषयी प्रत्येक चित्रपट प्रेमीला खबर आहे.
आम्ही अमिताभ आणि रेखाबद्दल बोलत आहोत, ज्याचे एकेकाळचे नाते सर्वांनाच ठाऊक होते. 1980च्या दशकात त्यांचे प्रेम इतके पसरले होते की याची चर्चा देशभर झाली होती. हेच कारण आहे की आजही बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय लव्ह स्टोरीमध्ये रेखा आणि अमिताभ यांचे नाव आहे. परंतु असे असूनही दोघे विवाहबंधनात मात्र अडकू शकले नाहीत याची खंत प्रत्येक सिनेरसिकाला आहेच.
या प्रेमकहाणीत एका बाजूला रेखाचे हृदय तुटलेले असताना, दुसऱ्या बाजूला अमिताभ यांना ही वेदना आपल्या छातीत पुरावी लागली. त्या काळात रेखा चित्रपटाच्या जगात फारशी विशेष कामगिरी करू शकली नव्हती, परंतु तिच्या सौंदर्याची जादू अमिताभवर इतकी वाढली की तो रेखाला हृदय देऊन बसला
या प्रेमप्रकरणाचा बाकी कुणाला फायदा नसेल झाला परंतु चित्रपट निर्मात्यांनी मात्र याचा भरपूर फायदा उचलला. दोघांनी मिळून एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. आणि ही जोडी प्रत्येक सिनेरसिकाच्या ओठावर येऊ लागली.या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना ठाऊक असतीलच, परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीविषयी सांगणार आहोत ज्याची माहिती फारशा लोकांना नाही आहे.
ही गोष्ट आहे 1981 मध्ये रिलीज झालेल्या ‘लावारिस’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानची. ‘लावारिस’ चित्रपटातील ‘आपका क्या होगा जनाब ए अली’ या गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासह इराणी मूळच्या नृत्यांगना ‘नेली’ यांनी नृत्य केले होते. हे गाणे तुफान सुपरहिट झाले. आणि हा चित्रपट देखील भरपूर गाजली. सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा होऊ लागली.
या गाण्याची लोकप्रियता पाहून मीडियाने अफवा पसरविली की अमिताभ बच्चन आणि डान्सर नेली यांच्यात अफेयर सुरू आहे. या विषयावर रेखाने अमिताभ बच्चन यांच्याशी भांडण सुरू केले. इतकेच नाही तर ती सेटवर पोहोचली आणि अमिताभ बच्चन यांना सगळ्यांसमोर चांगलेच सुनावले.
अमिताभ बच्चन यांनी रेखाला बराच वेळ समजावले पण रेखा अमिताभचे काहीही ऐकायला तयार नव्हती. वारंवार समजावूनही न ऐकल्यामुळे अमिताभ यांचा स्वतः वरील ताबा सुटला आणि त्यांनी रेखाला एकामागोमग एक अशा कानशिलात लगावला .
यावर रेखाला खूप राग आला आणि ती चित्रपटाचा सेट सोडून निघून गेली. तिने अमिताभ सोबत शूटिंग चालू असलेला ‘सिलसिला’ हा चित्रपट सोडला होता. नंतर अमिताभने रेखाच्या घरी जाऊन रेखाची खूप समजूत काढली.या घटनेनंतर दिग्दर्शक यश चोप्राने देखील रेखाला खूप समजावलं. यश चोप्राने रेखा आणि जया बच्चन दोघांनाही या चित्रपटासाठी तयार केलं.
सिलसिला या चित्रपटात जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका केली होती आणि रेखाने अमिताभ बच्चन यांच्या प्रेमिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला, एवढेच नव्हे तर बरेच लोक असेही म्हणतात की हा चित्रपट अमिताभ आणि रेखाच्या प्रेमकथेवर आधारित आहे. असो, लोकांना हा चित्रपट खूपच आवडला.