शहनाज गिलचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली, ‘सलमान खान माझ्या तोंडातुन…’

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, या धक्क्यातून अभिनेत्री शहनाज गिल अद्यापही सावरलेली नाही. शहनाज आणि सिद्धार्थ यांची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर शहनाजची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

रिएलिटी शो बिग बॉस फेम आणि पंजाबी गायिका शहनाज गिल नुकतीच तन्मय भट्टच्या शो ‘तन्मय रिऍक्शन्स’मध्ये दिसली. या मुलाखतीत शहनाज गिलने अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं. यादरम्यान तिने सलमान खानसोबतच्या नात्याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. तसंच शाहरुख खानबद्दलही अभिनेत्रीने मत व्यक्त केलं.

मुलाखतीदरम्यान तिने हेही सांगितले की, ती शाहरुखला नव्हे तर सलमान खानला सर का म्हणते. शहनाज गिल म्हणाली, “जेव्हा कोणी तुमची स्तुती करतं तेव्हा तो तुमच्या फेवरेट यादीत येतो… सलमान सरांना माहित आहे की, तुम्ही कोणासोबत बोलाल आणि तुम्हाला काय मिळेल… ते परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळतात.”

सलमान खानसोबत एकांतात वेळ घालवण्याच्या प्रश्नावर शहनाज म्हणाली, “लोकांना वाटलं असेल की, मी हे केलं असावं. मी फक्त शोच्या वेळेतच भेटले आहे, तेही फक्त काही वेळासाठी. सलमानला भेटताना मी लाजत होती. सलमानच्या फोन नंबरच्या प्रश्नावर ती म्हणाला की, माझ्याकडे सलमानचा नंबर नाही आहे.

शहनाज गिल म्हणाली, “सलमान खान तिच्या तोंडातून कधीच बाहेर पडणार नाही. सलमान सरच बाहेर पडेल कारण ते माझे सर आहेत. ती शाहरुख खानला शाहरुख खान म्हणते कारण तिने त्याला चित्रपटांमध्ये शाहरुखच्या रुपात पाहिलं आहे. शहनाज म्हणाली, “मी सलमान सरांना वैयक्तिकरित्या ओळखते.

त्यामुळे माझ्या तोंडून त्यांच्याबद्दल आदर आपोआप वाढतो आणि आपोआप माझ्या तोंडून सर बाहेर पडतं..”