राज कुंद्राच्या ‘त्या’ अॅपमध्ये झळकणार होती ही मराठी अभिनेत्री.. नाव जाहीर होताच माजली खळबळ..

अश्लील व्हिडिओ आणि वेब सीरीजची निर्मिती; तसंच ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर ते प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक झालेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोलिस कारवाईची कुणकुण आधीच लागल्याचं स्पष्ट झालं आहे. सहकाऱ्यांसोबत व्हॉट्सॲप ग्रुपवर केलेल्या चॅटवरून ही माहिती समोर आली आहे.

इतकं असूनही हा धंदा बंद करण्याऐवजी त्यानं ‘हॉ-टशॉ-ट्स’ला अन्य पर्याय शोधला होता आणि त्याद्वारे अ-श्ली-ल चित्रफित प्रदर्शित करण्याची पर्यायी योजना त्यानं तयार ठेवली होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे त्याची ही योजना फसली. याच प्रकरणात सामिल असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

‘हॉ-टशॉ-ट्स’ला पर्याय म्हणून राज नवीन अॅप लॉन्च करणार होता.या नवीन एपवरील चित्रपटासाठी राजनं त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तसंच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या नावाचा विचार केला होता. असा दावा गहना वशिष्ठ हिनं नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यामुळं एकंच खळबळ उडाली आहे.

राज कुंद्राला अटक होण्याच्या काही दिवसांपूर्वीच आमची त्याच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती. त्यावेळीच मला त्याच्या नवीन ‘बॉलिफेम’ या अॅप बद्दल समजलं होतं. या अॅपवर चॅट शो तसंच रिअॅलिटी शो , फिचर फिल्म , म्युझिकल व्हिडिओंचा समावेश असणार होता.

याबद्दल आमचं बोलणं झालं होतं. त्यात कोणताही अ-श्ली-ल किंवा बोल्ड मजकूर नसणार होता. असंही गहनानं स्पष्ट केलं आहे. या अॅपसाठीच्या एका चित्रपटासाठी त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तर आणखी एका चित्रपटासाठी सई ताम्हणकरला कास्ट करण्याचा विचार होता. असं गहना म्हणाली

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पॉ-र्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी धड टाकली त्यावेळी एका अ-श्ली-ल व्हिडिओचे चित्रीकरण सुरु होते. पोलिसांनी बंगल्यातून बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित अभिनेता, फॅशन डिझायनर आणि कॅमेरामन यांना अटक केली.

हिंदी आणि तेलगू सिनेमा आणि विशेषकरून जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या गेहाना वसिष्ठ हिचा सहभाग यामध्ये आढळल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. तेव्हापासून गुन्हे शाखा या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करीत होती. हे अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज बनविण्यासाठी अर्थपुरवठा राज कुंद्रा याच्याकडून होत असल्याचा संशय पोलिसांना होता. याबाबतचे ठोस पुरावे हाती लागल्यानं कुंद्रा याला अटक करीत असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.