या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पाहायचा आहे सैफ अली खानचा ‘छोटा नवाब’.. व्यक्त केली ईच्छा..

बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात अभिनेत्री आजकाल आपल्या मुलांबरोबर बराच वेळ घालवताना दिसत आहे. दरम्यान, प्रत्येकजण करीनाची चांगली काळजी घेत आहे, पण अशा परिस्थितीत तिची सासू अर्थात अभिनेत्री शर्मिला टागोर कुठेही दिसल्या नाहीत. शर्मिला टागोर यांनी अद्याप आपल्या नातवाचा चेहरासुद्धा पाहिलेला नाही

वास्तविक शर्मिला टागोर काही काळापासून आपल्या वडिलोपार्जित निवास म्हणजे पटौदी पॅलेसमध्ये राहत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी सून करीना कपूर-खान हिचे तोंडभरून कौतुक केले आणि सांगितले की, त्या बर्‍याच दिवसांपासून मुंबईत नाहीत.

लेडीज स्टडी ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांचा चित्रपट प्रवास आणि इतर बर्‍याच गोष्टी सांगितल्या. या मुलाखती दरम्यान त्यांनी करीनाने दिलेल्या एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, तिची सासू शर्मिला टागोर यांनी अद्याप त्यांच्या नातवाचे तोंड पाहिलेले नाही.

व्हिडीओमध्ये करीना म्हणाली, ‘तुमच्या छोट्या नातवाचा चेहरा तुम्ही अजून पाहिलेला नाही. कधी आपले संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि आपल्याबरोबर आम्ही थोडा वेळ घालवू शकू, याची आम्ही वाट पाहत आहोत.’ अर्थात त्या अद्याप मुंबईत आलेल्या नसल्याने त्यांनी तैमुरच्या छोट्या भावाचा चेहरा पाहिलेला नाही 

याशिवाय करीना (करीना कपूर) हीनेही तिच्या सासू शर्मिला टागोर यांचे कौतुक केले. करीना तिच्या सासूची स्तुती करताना पुढे म्हटले की, ‘मी भाग्यवान आहे, मला माहित आहे की तुम्ही खूप दयाळु आणि प्रेमळ आहात. तुम्ही खूप काळजी घेत असता.

तुम्ही नेहमीच केवळ आपल्या मुलांसाठीच नाही तर, नातवंडांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभ्या आहात. याशिवाय तुम्ही माझी देखील खूप काळजी घेतली. तुम्ही मला तुमच्या कुटूंबाचा एक भाग बनवलत.’ अश्या प्रकारे बेबो म्हणजेच करीनाने आपल्या सासू चे तोंडभरून कौतुक देखील केलं आहे.

करीनाच्या सासूसाठी असलेला करीना कपूरचा हा प्रेमळ संदेश सध्या खूप व्हायरल होत आहे. लोक करीना आणि शर्मिला टागोर यांच्या नात्याला पसंती देत ​​आहेत आणि त्या दोघींचेही कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच करीना दुसऱ्यांदा आई झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने आपल्या ‘बेबी बॉय’चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

फोटोमध्ये करीना आपल्या चिमुकल्याला मिठी मारताना दिसत आहे. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती लवकरच आमीर खानसमवेत ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. शेवटच्या वेळी करीना, अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ या चित्रपटामध्ये दिसली होती.