आपणा सर्वांना ठाऊकच आहे की बॉलिवूडमध्ये बरीच ह्रदये जोडली गेली आहेत आणि तितकीच तुटलेली देखील आहेत. काही जोडप्यांचे अफेअर इतके गाजले होते की ते मीडियामध्ये बराच काळ चर्चेचा विषय ठरले होते. पण काही प्रेम प्रकरण असेही राहिले आहेत ज्याची प्रेक्षकांना खबरही नव्हती. आज आपण अश्याच एका प्रेम प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध सुपरस्टार दबंग खान सलमानने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या तो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. सर्वाधिक चाहते असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेला सलमान बॉलिवूड क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहे. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.
सलमान खान सोबतच आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे त्यासोबत काम करणाऱ्या नवनवीन अभिनेत्र्या. सलमान नेहमी नवीन अभिनेत्रींना चित्रपटामध्ये घेऊन येत असतो. त्यामुळेच प्रत्येक नवख्या अभिनेत्रीस सलमान खानबरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असते. जेणेकरून त्यांना लवकरात लवकर स्टारडम मिळेल.
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करून चांगले नाव कमावले आहे. त्याचवेळी काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सलमान खानबरोबर काम केले पण आता त्या या इंडस्ट्री मधून पूर्णपणे गायब झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने सलमान खानच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते पण आता ती हि इंडस्ट्री सोडून गायब झाली आहे.
सलमान खानने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत पण सलमान खानचा पहिला चित्रपट कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खूप कमी लोक असे असतील ज्यांना याबद्दल माहिती असेल! ‘बीवी हो तो ऐसी’ हा चित्रपट सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात रेखा आणि फारुख शेख मुख्य भूमिकेत दिसले असले तरी सलमान खानदेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला, तेही नकारात्मक भूमिकेत. पण या चित्रपटामधील तुम्हला त्याची प्रेमिका आठवते का.
सलमान खानच्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटात नायिकेची भूमिका अभिनेत्री रेणू आर्याने साकारली होती. सलमान खान आणि अभिनेत्री रेणू आर्य यांनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील सलमान खान आणि रेणूची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती आणि हा चित्रपटही मोठा गाजला होता.
बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून पदार्पण करणारा सलमान खान तीन दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की, त्याच्या डेब्यू चित्रपटाची नायिका रेणू आर्या आता कुठे आहे, कशी आहे. रेणू आर्यने १९८८ मध्ये या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. नंतर तिने “चांदनी”, “बंजारन” आणि “जंगबाज” सारख्या हिट चित्रपटात भूमिका केली. असे असूनही, रेणूची बॉलिवूड कारकीर्द फक्त ४ वर्ष राहिली. यानंतर ती या चित्रपट उद्योगातून पूर्णपणे गायब झाली.
सलमान खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, त्याची अनेक वर्षांपूर्वी विमानामध्ये प्रवास करताना रेणू आर्याशी भेट झाली होती. पण ती इतकी बदलली होती की तिला ओळखणे फार कठीण झाले आहे. हा त्यांचा चित्रपट इतका होत झाला होता कि त्याने १०० दिवस बॉक्स ऑफिसवर क ब्जा केला होता. या चित्रपटाचा मोठा गाजावाजा झाला. असे म्हटले जाते की बिवी हो तो ऐसी चित्रपटानंतर सलमान आणि रेणू यांच्यातील जवळीक वाढली होती. दोघेही आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते.
परंतु सलमानचा राग आणि त्याची दा-रू पिण्याची सवय त्यांच्या प्रेमाच्या आड आली. त्याच्या ह्याच प्रॉब्लेम मुळे रेणूने सलमान पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये तिचा ‘बंजारन’ हा शेवटचा चित्रपट होता,हा चित्रपट फ्लॉ प ठरला आणि त्यानंतर रेणू गायब झाली. रिपोर्ट्सनुसार असे सांगितले जात आहे की अभिनेत्री रेणू आता गृहिणी असून ती आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. अभिनेत्री रेणूचे लग्न झाले असून त्यांना मुले आहेत. रेणू दोन मुलींची आई बनली असून त्यांचे नाव सलोनी आणि दिया आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचा लूक खूप बदलला आहे.
