‘वयाच्या 16 व्या वर्षी सलमानने माझा वापर करून घेतला.. पण नंतर मात्र फसवलं’ अभिनेत्रीचा तब्बल 20 वर्षांनी खुलासा..

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दबंग खान सलमानने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या तो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. त्याची फॅन फॉलोव्हिंगही खूप प्रमाणात वाढत आहे. सलमान बॉलिवूड क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहे. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

सलमान नेहमी नवीन अभिनेत्रींना चित्रपटामध्ये घेऊन येत असतो. बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीस सलमान खानबरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असते. पण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. काहींना ही संधी मिळाली तर काही अजून ही त्यांच्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करून चांगले नाव कमावले आहे. त्याचवेळी काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सलमान खानबरोबर काम केले पण आता त्या या इंडस्ट्री मधून पूर्णपणे गायब झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव सलमान सोबत जोडले गेले होते पण आता ती इंडस्ट्री सोडून गायब झाली आहे.

आपल्याला माहित असेल कि बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे यात संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ व युलिया वंतूर यांचे नाव सामील आहे. त्याचे प्रेमप्रकरण सगळ्यांच्याच चांगलेच परिचयाचे आहेत. या यादीत आणखी एक ओळखीचे नाव म्हणजे सोमी अली.

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात आपले नाव गाजवले होते. काही चित्रपटात काम केल्यानंतर आणि सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून निघून गेली. भारत सोडल्यानंतर ती मायमीमध्ये जाऊन स्थायिक झाली

परंतु याच सोमी अली ने आता पुन्हा एकदा सलमानची आठवण काढली आहे. पण ही आठवण काहीशी कडवट आहे आणि त्यामुळे सलमान काहीसा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता सलमान खानबरोबरच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाल्यानंतर या प्रकरणावर मौन सोडत, सलमान खानने आपली फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे

90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सोमी अलीने काही मोजक्या चित्रपटांद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यावेळी सलमान खानबरोबरच्या तिच्या नात्यामुळे ती अजूनही चर्चेत असते. आता एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत देताना सोमी अलीने सलमानशी ब्रेकअपपासून, तिच्या आयुष्याविषयी आणि करिअरविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

मुलाखतीत सोमी म्हणाली, ‘माझा त्याच्याबरोबर ब्रेकअप झाल्याला आता 20 वर्षे झाली आहेत. त्याने माझी फसवणूक केली आणि म्हणूनच मी त्याच्यापासून दूर गेले. त्यानंतर मी इथून निघून गेले.’ पुढे ती असेही म्हणाली की, गेल्या 5 वर्षांपासून ती सलमानशी बोलली देखील नाहीय.

आपला मुद्दा पुढे करत सोमी म्हणाली, ‘मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी भारतात आले नव्हते. जर, माझा माझ्या एक्सबरोबर ब्रेकअप झाला असेल तर, मी येथेच राहण्याचे कोणतेही कारण माझ्याकडे नव्हते.’

जेव्हा सोमी अली यांना विचारले गेले की, ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा विचार करते आहे का? किंवा पुन्हा चित्रपट करू शकते का? तेव्हा उत्तरादाखल ती म्हणाली, ‘नाही, मला चित्रपटात काही रस नाही. मी या इंडस्ट्रीत फिट बसत नाही. सोमी अलीच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 1991मध्ये ती भारतात आली होती. कारण तिला सलमान खानशी लग्न करून, संसार थाटायचा होता. हे नाते फार काळ टिकू शकले नाही, ज्यानंतर दोघांनी 1999मध्ये ब्रेकअप केले. त्यानंतर सोमी पुन्हा अमेरिकेत अभ्यास करण्यासाठी निघून गेली.

सोमी अलीच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 1991मध्ये ती भारतात आली होती. कारण तिला सलमान खानशी लग्न करून, संसार थाटायचा होता. हे नाते फार काळ टिकू शकले नाही, ज्यानंतर दोघांनी 1999मध्ये ब्रेकअप केले. त्यानंतर सोमी पुन्हा अमेरिकेत अभ्यास करण्यासाठी निघून गेली. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमीने अंत (1994), कृष्णा अवतार (1993), यार गद्दार (1994), तीसरा कौन? (1994) या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते

.