नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य घेणार घटस्फोट? समांथा ने केला धक्कादायक खुलासा-

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य सतत चर्चेत असतो. नागा चैतन्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी हे अतिशय लोकप्रिय कपल आहेत. पण समांथाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अडनाव काढल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

तसेत समांथा आणि नागा चैतन्य घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. आता समांथाला एका मुलाखतीमध्ये या बाबात प्रश्न विचारण्यात आला होता. एका खाजगी मुलाखतीत समांथाने आपल्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले होते.

समांथाने नुकतीच ‘द फिल्म कॅमपेन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘मी या सर्व अफवांवर आणि चर्चांवर तेव्हाच बोलेन जेव्हा मला योग्य वाटेल’ असे समांथा म्हणाली. समांथाने सध्या सुरु असलेल्या चर्चांवर मौन बाळगले आहे.

समांथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते दोघे वेगळे राहत असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण समांथाने या सर्व चर्चांवर वक्तव्य करणे टाळले आहे.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले.