मुस्लिम धर्मासाठी बॉलिवूड सोडल्यानंतर ‘ह्या’ अभिनेत्रीला करावा लागलाय मौलानासोबत निकाह.. झाली ट्रोल..

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. याच बॉलिवूडने जश्या ऑन स्क्रीन जोड्या बनवल्या आहेत तसेच बर्याच रिअल लाईफ जोडप्याना जोडण्यात ही बॉलिवूड इंडस्ट्रीचा खूप मोठा हात आहे. बॉलिवूड मध्ये कलाकारांची होणारे विवाह हा कायमच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे.

नुकताच असाच एक विवाहसोहळा बॉलिवूड मध्ये पार पडला आहे. सलमानसोबत काम केलेल्या ह्या एका अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून धार्मीक कारणांमुळे बॉलिवूड दुनियेला राम राम ठोकला होता. त्यानंतर आता तिने एका मौलवी सीबत निकाह केल्याचा व्हिडिओ नुकताच पोस्ट केला आहे ज्यामुळे इंटरनेट जगतात खळबळ माजली आहे.

धार्मिक कारणांमुळे मनोरंजनसृष्टी सोडणार्‍या सना खानने काल रात्री गुजरातमधील मौलाना मुफ्ती अनसशी लग्न केलं. सुरत इथे दोघांचं लग्न झाल. सना आणि तिचा नवरा मुफ्ती यांच्या लग्नाचे दोन व्हिडिओ आता समोर आले आहेत. त्यांचे लग्न सुरत येथे झाले होते. एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, एजाज खानने सना आणि मुफ्ती यांची ओळख करून दिली होती.

समोर आलेल्या दोन व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये सना खान तिचा नवरा मुफ्ती अनससोबत पायऱ्या उतरून खाली येताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीला केक भरवताना दिसत आहे. लग्नावेळी सनाने हिजाबसह पांढर्‍या रंगाचा भरतकाम केलेला ड्रेस घातला होता. तर नवऱ्याने मुफ्ती अनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता.

सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेताना सनाने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचं आयुष्य जगत आहे आणि या काळात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती सर्व काही मिळाले. ज्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.’ ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे असे दिसून आले.

सनाने पुढे लिहिले की, ‘एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात हा विचार येऊ ने का की त्याला कधीही मरण येऊ शकतं आणि मरणानंतर त्याचं काय होईल? या दोन प्रश्नांची उत्तरं मी अनेक काळापासून शोधत आहे. विशेषतः मृत्यूनंतर माझं काय होईल याबद्दल मी अधिक विचार करते.’ सना तिच्या विचारांवर ठाम असल्याचेही तिने यापुढे सांगितले आणि यात काहीही बदल होणार नाही.

जेव्हा मी माझ्या धर्मात याचं उत्तर शोधलं तेव्हा मला कळलं की हे जीवन खरंतर मृत्यूनंतरचं जीवन सुधारण्यासाठी आहे. मृत्यूनंतरचं जीवन तेव्हाच सुंदर होईल जेव्हा तुम्ही निर्मात्याने सांगितलेल्या मार्गावर चालाल. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे पळू नका.’ असे म्हणत तिने आपला निर्णय पक्का असल्याची खात्री मीडियासमोर दिली आहे.

सना पुढे लिहीते, ‘जेव्हा मी धर्मात या गोष्टीचं उत्तर शोधलं तेव्हा मला समजलं की माणसाला मिळालेलं आयुष्य मृत्यूनंतरचं जीवन सुधारण्यासाठी आहे. आणि त्यामुळे मी पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर जात आहे.’ पण आता सनाच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत काही जण तिला शुभेच्छा देत आहेत तर काही मेकअप करणं आणि लग्नाननंतर केक कापणं या कारणामुळे ती ट्रोलही होत आहे.

.