बॉलिवूडचा सुपरस्टार, संजु बाबा नावाने ओळखला जाणारा दिग्गज अभिनेता सुनील दत्त यांचा सुपुत्र, संजय दत्त याचे बॉलिवूड मध्ये लाखो चाहते आहेत. नुकतंच 2 वर्षांपूर्वी संजय दत्तवर एक बायोपिक तयार केला गेला होता. हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता व सुपरहिट ठरला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई केली.
संजय दत्तच्या आयुष्यावर जेव्हा हा चित्रपट बनवला होता, तेव्हा संजय दत्तच्या आयुष्याशी निगडित अनेक न पाहिलेले आणि न ऐकलेले किस्से या चित्रपटाद्वारे लोकांच्यासमोर आले. आज आम्ही तुम्हाला संजय दत्तच्या जीवनाशी निगडित असंच एक रहस्य सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सेलेब्रिटी आणि त्यांचे फॅन्स यांमध्ये कायमच अतूट नातं असतं. अनेक फॅन्स त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीला भेटण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात याबद्दलचे किस्से आपण कायमच ऐकत आलो आहोत. संजय दत्त ही आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्रीचे इतके मोठे फॅन होते की त्यांनी तिला भेटण्यासाठी भयंकर प्रकार केला.
८० च्या दशकात बॉलीवूडमध्ये श्रीदेवी त्यांच्या करिअरच्या टॉपवर होत्या. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर श्रीदेवी साऊथमध्ये परिचित अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदीसोबतच तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्ल्याळम भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्या बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री झाल्या.
संजय दत्त श्रीदेवी यांचा खुप मोठा चाहता होता. ८० च्या दशकात श्रीदेवी करिअरच्या टॉपवर होत्या. तर संजय दत्तने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. श्रीदेवी अनेक साऊथसोबतच हिंदीमध्ये देखील काम करत होत्या. त्या एकदा मुंबईत त्यांच्या चित्रपटाची शुटिंग करत होत्या.त्यावेळी त्यांना बघण्यासाठी त्यांचे अनेक चाहते शुटिंग लोकेशनवर आले होते.
शुटिंगच्या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. श्रीदेवी मुंबईत शुटिंग करत आहेत. ही गोष्ट संजय दत्तला समजली. मग काय संजू बाबाने आपल्या आवडत्या अभिनेत्री भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी संजय दत्त खुप न- शेत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला शुटिंगच्या सेटवर जाण्यासाठी थांबवले. त्यावेळी त्याने मित्रांशी भां डण केली आणि अनेक गोष्टींची तो ड-फो-ड केली. शेवटी मित्रांनी त्याला सोडले.
अशा अवस्थेत त्याने सेटवर श्रीदेवीला शोधण्यास सुरुवात केली. पण त्या सेटवर नव्हत्या. त्याने सगळीकडे शोधा शोध करायला सुरुवात केली. शेवटी तो श्रीदेवीच्या रूमपर्यंत पोहोचला. संजय दत्त श्रीदेवीच्या रुममध्ये गेला. संजय दत्तला पाहून श्रीदेवी यांना खुप मोठा धक्का बसला होता. कारण संजयची अवस्था खुप खराब झाली होती. त्याचे लाल डोळे आणि त्याचा तो अवतार बघून त्या खुप घाबरल्या. श्रीदेवी संजय दत्तला बघून थरथर का पत होत्या.
एवढेच नाही तर श्रीदेवी यांनी रडायला सुरुवात केली होती. पण संजयला या गोष्टी कळत नव्हत्या. कारण त्याला कोणत्याच गोष्टीचा होश नव्हता. तो न शे त होता. सेटवरील स्टाफने संजयला श्रीदेवीच्या रूममधून बाहेर काढले.या घटनेनंतर श्रीदेवी यांनी आयुष्यात कधीच संजय दत्तसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तला या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याला काही आठवत नव्हते. पण तो अजूनही श्रीदेवीचा चाहता होता.
एका मुलाखतीमध्ये संजय दत्तने सांगितले होते की, ‘त्याला त्या दिवशी त्याने काय केले हे आठवत नाही. पण ज्यावेळी संजय चांगला स्टार झाला आणि त्याला श्रीदेवीसोबत काम करण्याच्या ऑफर येत होत्या. त्यावेळी श्रीदेवी त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या. म्हणून त्याला ही त्याच्या आयुष्यातील खुप मोठी चुक वाटते’.

श्रीदेवीने संजयसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले. कारण त्यासाठी संजयने अनेक वेळा त्यांची माफी मागितली. पण त्या फक्त कामासाठी सेटवर यायच्या आणि निघून जायच्या. त्यांनी कधीही संजयसोबत मैत्री केली नाही.