अखेर समोर आले माधुरी आणि संजय दत्त यांच्यातील ब्रेकअपचे खरे कारण.. संजय रोज रात्री घ्यायचा-

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

आताच्या काळात जरी अशा घटना कमी झाल्या असतील तरी मागील दशकात मात्र असे प्रकरण सर्रास समोर येत असत. असे अनेक कलाकारांचे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते ज्यांनी तेव्हा जगासमोर मान्य नाही केलं.. परंतु आता काही वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला मागील दशकातील अशाच एका जोडप्याबद्दल सांगणार आहोत जे बॉलिवूड मधील सर्वात लाडके कपल म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होते. आणि ते दोघे एकमेकांसोबत लग्न करतील अशीही सगळ्या चाहत्यांना खात्री होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही आणि दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. आम्ही बोलत आहोत माधुरी आणि संजय दत्त यांच्याबद्दल.

बॉलिवूडमध्ये धक-धक गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनं ३ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. चंदेरी दुनियेतील तिचा हा ‘दिल’खेचक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सिनेसृष्टीत आज सुपरस्टार असलेल्या अनेक अभिनेत्री माधुरीला पाहून या क्षेत्रात आल्या, असं अभिमानानं सांगतात.

संजय दत्त आणि माधुरी यांनी अनेक वर्ष इंडस्ट्रीत एकत्र काम केलंय. त्यामुळं ते एकमेकांना ‘अरे, तुरे’ म्हणूनच हाक मारत असतील असं तुम्हाला वाटत असेल. पण तसं नाहीय. संजय दत्त आजही माधुरीला ‘माधुरी मॅम’ असंच म्हणतो. गेल्या वर्षी दोघांचा त्यांचा ‘कलंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जवळपास वीस वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली होती.

एका कार्यक्रमामध्ये संजयला ‘पुन्हा एकदा माधुरीसोबत काम करताना कसं वाटलं?’ असा प्रश्न विचारण्यात आला होतो. तेव्हा ‘माधुरी मॅमसोबत काम करताना खूप छान वाटलं’ असं उत्तर त्यानं दिलं होतं. एवढी वर्षी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतरही तो अजूनही माधुरीला ‘मॅम’ म्हणतोय यावरुन उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

90 च्या दशकात माधुरी दीक्षितची गणना इंडस्ट्रीच्या टॉप मॉडेलमध्ये होत होती. ‘तेजाब’ आणि ‘दिल’ यांसारखे ब्लॉकबस्टरस तिच्या नावावर होते. 1991 साली आलेल्या ‘साजन’ चित्रपटाच्या सेटवर दोघेही जवळ आले. चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिटही ठरला.

रिल लाईफमध्ये रोमांस करता करता माधुरी-संजय एकमेकांना खरेच डेट करु लागले.यानंतर दोघांना ‘खलनायक’ चित्रपटासाठी साईन करण्यात आले. चित्रपटात माधुरीची जोडी जरी जॅकीश्रॉफसोबत होती तरी स्क्रिनवर जास्तवेळ माधुरी आणि संजयच सोबत दिसले होते.

विशेष म्हणजे एकेकाळी संजय आणि माधुरीच्या अफेअर्सच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या.नव्वदीच्या दशकात संजय आणि माधुरी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होती. त्याच दरम्यान, संजय दत्तला अ-वै-ध श-स्त्र बाळगल्याप्रकरणी अ-टक झाली होती. संजय दत्त तु-रूंगात गेल्यानंतर हे नाते संपुष्टात आल्याचं बोललं जातं.

परंतु असे म्हटले जाते की खरे कारण काही और च आहे. संजय दत्त तुरुंगात जाण्या आधीपासूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. आणि त्याचे एकमेव कारण होते ते म्हणजे संजय ला असलेलं दा-रू चे व्यसन. संजय रोज रात्री दा-रू घ्यायचा आणि पार्ट्या करायचा. त्याची ही सवय माधुरीला अजिबात आवडत नव्हती.२०१७मध्ये संजय दत्तच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात संजयच्या खाजगी आयुष्याबद्दस आणि प्रेमप्रकरणांबद्दल अनेक खुलासे करण्यात आले.

चित्रपटात अभिनेत्री करिश्मा तन्ना हिनं एका ‘डान्सींग क्वीन’ची भूमिका साकारली होती. ही भूमिका माधुरी दीक्षितची साधर्म्य असणारी असल्याची चर्चा होती. त्यामुळं चित्रपटात आपल्याशी काही संबंधित भाग नको अशी विनंती माधुरीनं दिग्दर्शक राजकुमार हिराणीला केली होती. राजकुमार हिराणीनं माधुरीची विनंती मान्य करत चित्रपटातून तो भाग वगळला होता.