संजू बाबाच्या या तिन्ही बायकांसमोर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्र्याही फेल.. 3 नंबर तर..

बॉलिवूड जगत खूप मोठे आहे आणि इथल्या सर्व स्टार्सची स्वतःची एक आगळी वेगळी कहाणी आहे. त्याचबरोबर काही स्टार्स असेही आहेत की जे बहुतांश वेळी या ना त्या कारणाने चर्चेतच असतात. मग ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीमुळे असो किंवा मग त्यांच्या चित्रपटांमुळे.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा नामांकित अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा बोलबाला फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहेत. त्याचे जगभरात लाखो दिवाने आहेत. आणि फक्त तोच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंबच अभिनय क्षेत्रात कार्यरत होतं. त्याचे वडील तर एकेकाळचे दिग्गज अभिनेते राहिलेले आहेत.

आम्ही प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तबद्दल बोलत आहोत. आपणा सर्वांना हे माहितच आहे की संजय दत्तचे संपूर्ण आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. मग ते त्याच्या लव्ह अफेअर्स मुळे असो वा त्याच्या अंडरवर्ल्ड सोबत असलेल्या संबंधां मुळे. परंतु असे असूनही संजय दत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्यांपैकी एक आहे.

संजय त्याच्या लव्ह अफेअर्सच्या बातम्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असतो. ‘वास्तव’ चित्रपटा पासून आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलेला संजू बाब बॉलिवूड मध्ये एक प्रतिष्ठित अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. संजय दत्त हा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील दत्त आणि एकेकाळची टॉपची अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. ऍक्शन फिल्म असो, विनोदी चित्रपट असो किंवा मग रोमँटिक असो, संजय दत्तने जवळपास प्रत्येक प्रकारच्या चित्रपटांत काम केले आहे. संजय दत्तच्या चालण्याच्या शैलीचे अजूनही लाखो चाहते आहेत.

आपल्या पालकांप्रमाणेच त्यानेही फिल्मी जगतात चांगले नाव कमावले, परंतु आयुष्यातही त्याने बरेच चढउतार देखील पाहिले. जर आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलावायला गेलो तर संजय दत्तचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच तणावपूर्ण राहिले आहे. ज्यामुळे त्यांचे विवाहित जीवन अनेक वेळा धोक्यात आले आहे. अभिनेता संजय दत्तचे आतापर्यंत तीन लग्न झाले असून त्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगी त्रिशाला आणि तिसरी पत्नी मान्यता दत्तपासून दोन जुळी मुलं आहेत.

रिचा शर्मा: रिचा शर्माने संजय दत्तच्या आयुष्यात त्यांची पहिली पत्नी म्हणून पाऊल ठेवले होते परंतु त्याआधी तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये संजय सोबत काम देखील केले होते. या दरम्यानच संजू बाबा रिचा शर्माच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर संजयने रिचाला लग्नासाठी प्रपोज केले. परंतु त्यावेळी रिचाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण नंतर असे म्हटले जाते की ती सहमत झाली आणि त्यानंतर दोघांनी 1987 साली लग्न केले. त्यानंतर 1988 मध्ये तिने त्रिशाला नावाच्या मुलीलाही जन्म दिला. पण नियतीला मात्र त्यांचे हे सुख फार काळ बघावले गेले नाही. रिचा शर्माचे लग्नानंतर ब्रेन ट्यूमरमुळे नि-धन झाले. या घटनेनंतर मुलगी त्रिशला देखील संजू पासून दुरावली . आणि ती अमेरिकेत आपल्या आजी आजोबांकडे स्थायिक झाली.

रिया पिल्लई: त्रिशला संजयच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर संजयला खूपच एकटे वाटू लागले, ज्यामुळे 1998 मध्ये त्यांनी रिया पिल्लईशी लग्न केले, परंतु असे म्हणतात की त्यांचे लग्न परस्पर मतभेदांमुळे जास्त काळ टिकू शकले नाही आणि 2005 ला दोघामध्ये झालेल्या भांडणामुळे घट-स्फोट झाला.

मान्यता दत्त: मान्यता ही संजयच्या आयुष्यात तेव्हा आली जेव्हा तो त्याच्या जीवनात एक मोठा संघर्ष करत होता. त्यानंतर त्याने 2008 मध्ये मान्यता सोबत लग्न केले आणि नंतर २०१० मध्ये संजय आणि मान्यता यांना जुळे झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्याच्या घडीला हे दोघेही आनंदाने आपले जीवन व्यतीत करत आहेत. आता मान्यता ही संजय दत्त यांचे प्रॉडक्शन हाऊससुद्धा सांभाळते आहे.