सारा अली खान या लोकल मार्केटमधून करते शॉपिंग, वाचून बसेल धक्का

बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या स्टाईल स्टेंटमेंटमुळे चर्चेत असतात. तसेच त्यांचे वेगवेगळ्या स्टाईल आणि आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. याशिवाय त्यांनी परिधान केलेले आऊटफिट व ज्वेलरीच्या किंमती बऱ्याचदा ऐकायला मिळतात.

या किंमती लाखोंच्या घरात असतात. पण काही सेलिब्रेटी असेदेखील आहेत ज्यांना साधेपणाने रहायला आवडतं. ते आपले कपडे किंवा ज्वेलरी सामान्य लोकांप्रमाणे रस्त्यांवरून विकत घेतात. बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी चक्क लोकल मार्केटमधून कपडे विकत घेतात.

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंगला काही महिन्यांपूर्वी हैद्राबादमध्ये लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना पाहण्यात आले होते. सारा अनेकवेळा लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसते. एका मुलाखतीत साराने ती लोकल मार्केट मधून कपडे खरेदी करते असे स्वतः सांगितले होते.

आता सारा अली खाननं Elle India ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत देखील ती कपडे कुठून विकत घेते याविषयी तिने सांगितले आहे. या मुलाखतीत साराने सांगितले आहे की, ती तिचे अनेक कपडे मुंबई आणि दिल्लीतील लोकल मार्केटमधून विकत घेते. साराने सांगितले, मला कपड्यांवर जास्त पैसे खर्च करायला अजिबात आवडत नाही.

खरं सांगू तर मला ब्रँडेड कपड्याची आवड नाही. अनेक ब्रँड्स असे आहेत ज्यांच्या कपड्यांची किंमत माझ्या महिन्याच्या कमाईपेक्षा देखील जास्त आहे. त्यामुळे या ब्रँड्सपासून मी दूर राहाणेच पसंत करते. मी दिल्ली येथील सरोजिनी नगरमधील मार्केटमधून सलवार कमीज आणि चपला विकत घेते. तसेच मुंबईतील लोकल मार्केटमधून देखील शॉपिंग करते.

सारा अली खान स्टारकिड असली तरी अल्पावधीतच तिच्या अभिनय कौशल्याने तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचेही लाखो लोक आज दिवाने आहेत. साराने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. तिचा कुली नं 1 हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.